युतीबाबत ठाकरेंची भूमिका सबुरीची, निर्णय दोन दिवसात

युतीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या दोन दिवसात अंतिम करावा अशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
thakrey_Fadanvis
thakrey_Fadanvis

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कमी जागा घेऊ नयेत त्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असा आग्रह शिवसैनिकांनी धरला आहे. मात्र शिवनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सबुरीचे भूमिका घेतली असल्याचे वृत्त आहे . 

 असे असले तरी युतीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या दोन दिवसात अंतिम करावा अशा हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेनेही जागावाटप लौकरात लवकर निश्‍चित करण्यात मान्यता दिली असल्याची चर्चा आहे. 
 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्यातरी  युतीच्या बाजूनेच कौल दिला आहे. आज भाजपने सकाळपासून बैठकांचा सपाटा चालविला होता. या बैठकांमध्ये प्रत्येक महसूल विभागात किती जागा लढवाव्यात याचा आढावा घेण्यात आला. 

निवडणूकीची घोषणा होताच मतदारसंघांकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने आता सर्व चर्चा गणेशोत्सवादरम्यानच पूर्ण व्हाव्यात असा प्रस्ताव गिरीष महाजन यांनी ठेवला असे समजते.   त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वासू सहकारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याशी काही मतदारसंघांच्या या ऍड अदलाबदलीबाबतही चर्चा केली. 
 

शिवसेनेत थोड्या कमी जागा लढविण्याचा विचार सध्या समोर आला असून त्या किती कमी असाव्यात याबाबत मात्र मंथन सुरू आहे. गेल्या निवडणूकीत भाजपने 122 जागांचा आग्रह धरला होता. तो मान्य न झाल्याने युती तुटली. मात्र अंतिमतः भाजपने 123 मतदारसंघ जिंकले.  त्यामुळे भाजपा सादर करत असलेल्या दाव्यावर सखोल विचार व्हायलाच हवा, असे सेनेतील भाजप समर्थकांचे मत आहे.

 नरेंद्र मोदी यांची महती आणि कलम 370मुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेता सध्या सामोपचाराची भूमिका घ्यावी, असे मत मांडण्यात आले आहे. 

कोकण विभागात भाजपला फारसे स्थान नसल्याने तेथील जागा शिवसेनेला मोकळ्या हाताने द्याव्यात, विदर्भात मात्र स्वतःकडे झुकते माप ठेवावे, असा भाजपचा विचार आहे. मराठवाड्यात वाढलेली ताकद आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले इन्कमिंग लक्षात घेता हे दोन्ही भाग अडचणीचा विषय ठरण्याची शक्‍यता आहे.मुंबई आणि पुणे शहरातील जागावाटप देखील महत्वाचे मानले जात आहे .

 महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांना प्रत्येक मतदारसंघातून स्वबळाचा निरोप मिळत असताना प्रत्यक्षात हा निर्णय आमच्यावर सोडून द्या असे सांगण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. अन्य पक्षातून भाजपत येणाऱ्या बड्या नेत्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी युतीबाबत मात्र मौन न बाळगता ठाम मते व्यक्त केली असली तरी महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असे वारंवार ध्वनीत केले जाते आहे. 

आज व्यवस्थाविषयक झालेल्या बैठकीत भूपेंद्र यादव यांना विभागवार भाजप सेनेच्या यशाचा आराखडा सादर केला गेला. युती करायचीच असेल तर किमान 170 मतदारसंघ भाजपनेच लढावेत असा आग्रह धरण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com