औरंगाबादेतील 9-0 विजयावर उध्दव ठाकरे खूष

.रंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेने सर्व सहा आमदार निवडून आणले, शिवाय भाजपचे तीन उमेदवारही विजयी झाले .
औरंगाबादेतील 9-0 विजयावर उध्दव ठाकरे खूष

औरंगाबादः संघटना म्हणून प्रत्येकाने एकत्रितपणे काम केले तर यश मिळतेच, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील युतीच्या सर्व जागांवरील विजयाबद्दल आनंद व्यक्त केल्याची माहिती शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांनी दिली.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक नुकतीच मातोश्रीवर पार पडली. उध्दव ठाकरे यांनी सर्व विजयी आमदारांचे अभिनंदन करतांनाच संघटनात्मक कामाचे कौतुकही केले. विशेषता औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेने सर्व सहा आमदार निवडून आणले, शिवाय भाजपचे तीन उमेदवारही विजयी झाले. जिल्ह्यात युतीने सर्व जागा जिंकत विरोधकांना खऱ्या अर्थाने  चीत केले.

औरंगाबादेतील विजयाचे विषेश कौतुक करतांना, उध्दव ठाकरे यांनी संघटना म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे काम केल्याचे हे यश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अंबादास दानवे म्हणाले, एमआयएमकडून मध्यची जागा पुन्हा मिळवणे, पश्‍चिम मध्ये भाजप बंडखोरीचे आव्हान असतांना तिसऱ्यांदा हा मतदारसंघ जिकंणे आणि सर्वात महत्वाचे आणि संघटनेच्यादृष्टीने कन्नड विधानसभेची जागा आमच्यासाठी खूप महत्वाची होती.

कन्नडमधील विजयाने शिवसैनिकांना दहा हत्तींचे बळ मिळाले आहे. विजय शिवसेनेचाच होणार याची खात्री होतीच. शिवसेनेच्या सर्व जागा निवडूण येतील हे मी यापुर्वीच सांगितले होते. प्रचार आणि संघटनेच्या माध्यमातून जो संपर्क त्या त्या मतदारसंघात लोकांशी आला त्यावरून लोक शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे जानवत होते.

सिल्लोड, पश्‍चिम, कन्नड मतदारसंघाबद्दल राजकीय वर्तुळातून शंका व्यक्त केल्या जात होत्या, पण त्या निरर्थक होत्या हे निकालानंतर स्पष्ट झाले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अपेक्षित असे काम जिल्ह्यामध्ये झाले. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, महिला, शिवसैनिकांनी केलेले कष्ट यामुळे हा विजय साकारता आला. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत शिवसेना अशा पध्दतीने काम करून विजय हस्तगत करत राहील असा विश्‍वास देखील अंबादास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com