uddhav thakare demand gst contribution get speedily | Sarkarnama

"जीएसटी'चे पैसै त्वरेने मिळावेत - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील सर्व महत्वाच्या प्रश्‍नावर चर्चा झाली त्यात जीएसटीचे पैसे ज्या वेगाने यायला हवे आहेत त्या वेगाने येत नाही हे निदर्शनास आणून देण्यात आले तसेच हे पैसे त्वरेने द्यावेत असा मुद्दा पंतप्रधानांबरोबरच्या चर्चेत उपस्थित करण्यात आला आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्या भेटीनंतर सांगितले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी राज्यात कुठलीही कंपनी आलेली नाही हेदेखील स्पष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्याला केंद्राचे सर्व प्रकारचे सहकार्य मिळत आहे असे सांगून त्यांनी एनआरसीला घाबरण्याचे कारण नाही तसेच एनपीआर म्हणजे जनगणेबद्दल जर कुठल्या माहिती गोळा करण्याच्या रकान्याबद्दल आक्षेप असेल तर त्यावेळी तो मुद्दा केंद्राकडे मांडता येईल आता त्याबद्दल काळजी करण्याचे कारण नाही, सीएएला आमचा पाठिंबा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याशी आमच्या सरकारचे कुठलेही मतभेद नाहीत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंबंधीचे वृत्त चुकीचे आहे असेही त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख