uddhav_thakre
uddhav_thakre

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे दात पाडू : उद्धव ठाकरे

माजी खासदारशिवाजी माने यांनी आज शिवबंधन बांधले. यासोबतच जिल्‍हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश वडगावकर, जिल्‍हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, राजेश्वर पतंगे, बाळापूरचे उपसरपंच विजय बोंढारे, ओंकार आमाने, सचिन पेंढारकर, वैजनाथ कोल्‍हे, मुन्ना देशमुख, नुरूला देशमुख, यांच्‍यासह कार्यकर्त्यांनी यांनी प्रवेश घेतला.

आखाडा बाळापूर : महायुती सरकारच्‍या दहा रुपयात जेवण या योजनेमध्ये भ्रष्टाचार दिसणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचे निवडणुकीत दात पाडू, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.१३) येथे दिला.

आखाडा बाळापूर येथे कृषी उत्‍पन्न बाजार समितीच्‍या मैदानावर महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांच्‍या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, ज्‍योती ठाकरे, खासदार हेमंत पाटील, आमदार तान्‍हाजी मुटकुळे, उमेदवार संतोष बांगर, आनंदराव जाधव, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, मीनाक्षी बोंढारे, राजेंद्र शिखरे, मोहनसिंग बायस, सोपान पाटील बोंढारे, डी.के. दुर्गे यांच्‍यासह मान्यवर उपस्‍थित होते.

यावेळी बोलताना श्री. ठाकरे म्‍हणाले की, मागील पाच वर्षात राज्‍यात झालेल्‍या विकासामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे. विविध योजनांच्‍या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महायुतीच्‍या सरकारने केले आहे. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्‍न राहणार आहेत. दुष्काळग्रस्‍त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याची योजनाही अमलात आणली जाईल.

राज्‍यातील गरजूंना दहा रुपयात जेवण देणार हा आमचा वचननामा आहे. मात्र यामध्ये भ्रष्टाचार असल्‍याचा आरोप केला जात आहे. मात्र आम्‍ही गरजूना दोन घास देतो, त्‍यामध्ये खड्यासारखे कशाला येतात असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला. गरजूच्‍या योजनांमध्ये खड्यासारखे येणाऱ्या अनेकांचे दात पाडले. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे दात पाडल्‍याशिवाय राहणार नाही असे त्‍यांनी स्‍पष्ट केले. 

आदिवासी व इतर जातीमध्ये विष कालवण्याचे काम केले जात आहे. इतर समाजाचे प्रश्न सोडवताना आदिवासी समाजाच्‍या हक्‍काला कुठेही धक्‍का पोहोचणार नाही असे त्‍यांनी स्‍पष्ट केले. हिंगोली लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्‍ला असून लोकसभा निवडणुकीत या गडावर भगवा फडकवला. आता विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन त्‍यांनी केले. आखाडा बाळापूर तालुक्‍याची मागणी आपणच पूर्ण करणार असल्‍याचे आश्वासन त्‍यांनी यावेळी दिले.

माजी खासदाराची घरवापसी


माजी खासदार  शिवाजी माने यांनी आज शिवबंधन बांधले. यासोबतच जिल्‍हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश वडगावकर, जिल्‍हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, राजेश्वर पतंगे, बाळापूरचे उपसरपंच विजय बोंढारे, ओंकार आमाने, सचिन पेंढारकर, वैजनाथ कोल्‍हे, मुन्ना देशमुख, नुरूला देशमुख,  यांच्‍यासह कार्यकर्त्यांनी यांनी प्रवेश घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com