वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणीकरांना दिलेला शब्द पाळणार : उध्दव ठाकरे

होय...! मी परभणीकरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दिलेला शब्द पाळणार आहे. येत्या जून महिन्यात परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिली जाईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
 वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणीकरांना दिलेला शब्द पाळणार : उध्दव ठाकरे

परभणी : परभणीकरांच्या स्वप्नातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिक्षा संपली आहे. महाविद्यालयासाठी दिलेला शब्द आपण जून महिण्यात पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या पाच महिण्यात परभणीत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरु होण्याची शक्‍यता आहे. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे अशी येथील जनतेची मागणी आहे. यासाठी काही दिवसापूर्वी राज्य शासनाची त्रिसदस्यीय समिती देखील परभणी शहरात आली होती. या समितीने महाविद्यालयाच्या उभारणीसाठी लागणारा सर्व अहवाल राज्य शासनाकडे दिला आहे. हा अहवाल सकारात्मक असल्याने परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी हिरवा कंदील मिळेल अशी अपेक्षा आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेत परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकांच्या मतदानानंतर झालेल्या राजकीय घडामोडी मुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने परभणीकरांना दिलेला शब्द ते पूर्ण करणार अशी अपेक्षा सर्वांना लागली होती. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील बडे नेते माजी आमदार ऍड. विजयराव गव्हाणे यांनी मंगळवारी (ता.14) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. 

या भेटी दरम्यान त्यांनी परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. आपण परभणीकरांना जाहीर सभेत वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द दिला होता याची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी देखील मला दिलेल्या शब्दाची आठवण आहे. परभणीकरांना दिलेला शब्द मी जरूर पूर्ण करणार आहे. येत्या जून महिण्यात परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत केले जाईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माजी आमदार ऍड. विजयराव गव्हाणे यांना सांगितले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शब्दाचे पक्के समजले जातात. त्यामुळे येत्या जून महिण्यात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळणार हे निश्‍चित समजले जात आहे. 

आमच्या आशा पल्लवीत 
आम्ही सातत्याने परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करत आहोत. मंगळवारी (दि.14) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून त्यांना त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासाठी सकारात्मकाता दाखविल्याने आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत असे परभणीचे माजी आमदार ऍड. विजयराव गव्हाणे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com