उद्धव ठाकरे यांचे एका दगडात असेही दोन पक्षी!

...
uddhav thackray transfers two officers
uddhav thackray transfers two officers

मुंबई : आपल्या कार्यपद्धतीमुळे लोकप्रतिनिधींमध्ये अप्रिय असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टेन्शन वाढवले आहे. तर, फडणवीस यांच्या अत्यंत्य विश्‍वासू मुंबई मेट्रो महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालिका अश्‍विनी भिडे यांची बदली करुन ठाकरे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.

मुंडे हे अत्यंत कार्यशील सनदी अधिकारी मानले जातात. त्यामुळेच फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात त्यांची नियुक्ती नाशिक महापालिका आयुक्त पदी झाली होती.मात्र,त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे भाजपचेच नगरसेवक अडचणीत येऊ लागल्याने अखेर त्यांची बदली राज्याच्या नियोजन विभागात सह सचिव पदी करण्यात आली. मात्र,तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री सुधिर मनगुंटीवार यांना मुंडे यांची कार्यपध्दती न रुजल्याने त्यांना मुंबई जिल्हा एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी पाठविण्यात आले. ही साईड पोस्टिंग मानली जाते.

मुंडे हे अत्यंत शिस्तीचे अधिकारी मानले जातात. नागपूर हा भाजपचा गड आहे.मुंडे हे नागपुर आयुक्त पदी गेल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

अश्‍विनी भिडे या फडणवीस यांच्या अत्यंत विश्‍वासू अधिकारी होत्या. भिडे यांनी कुलाबा वांद्रे सिप्झ यांनी मेट्रोचा हा प्रकल्प मार्गी लावला आहे.मात्र,गोरेगाव येथील आरे वसाहतीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडमुळे त्यांनी ठाकरे यांची नाराजी ओढावून घेतली होती. ठाकरे कारशेडला विरोध करत असताना भिडे या कारशेडचे थेट समर्थन करत होत्या. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीमुळे भिडे यांची बदली झाल्याचे मानले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com