`फडणवीस माझ्यासोबत असते तर मी आज टिव्ही पाहत बसलो असतो...`

Uddhav thackrey-devendra fadanvis
Uddhav thackrey-devendra fadanvis

मुंबई : तुम्ही जर माझ्यासोबत असता तर मी घरी बसून टीव्हीवर विरोधी पक्षनेता निवडीचा कार्यक्रम बघत बसलो असतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत त्यांचे अभिनंदन केले.

फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घोषणा केली. त्यानंतर त्यांना त्या जागेवर बसविण्यात आले. मुख्यमंत्री आणि इतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे जागेवर जाऊन अभिनंदन केले.

या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपलं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे. तुमचा परिचय आज माझ्या हातात आला. आधी आला असता तर बरं झालं असतं. 25 वर्ष मैत्री असलेले विरोधात बसलेत आणि विरोधात असलेले  माझ्या सोबत बसले आहेत.

आयुष्य एक रंगभूमी आहे. कधी कोणाला काय रोल करावा लागेल, हे सांगता येत नाही. मी इथे पुन्हा कधी येईल, असं बोललो नव्हतो. पण माझं भाग्य होतं म्हणून मी इथे पुन्हा आलो. मला शेतकरी कर्जमुक्तच नाही करायचा तर चिंतामुक्त करायचा आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही आजही माझे मित्र आहेत. त्यावेळी ही हिंदुत्व होत आणि आजही आहे. ही हिंदत्वाचा जोड आजही कायम राहील. पण दिलेला शब्द पाळणं हे माझं हिंदुत्व आहे. मी पाच वर्षात कधी ही सरकारला धोका दिला नाही. मला काळोखात काही करायचं नाही. विरोधी पक्षनेता माझा जवळचा. मित्र आहे अंतर ठेवायला नको. तुम्ही सहकारी म्हणून माझे काम करा, असे आवाहन त्यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com