एक रुपयात आरोग्य तपासणी; घरच्या वीजबिलात तीस टक्के सवलत : ठाकरेंची नवी घोषणा

एक रुपयात आरोग्य तपासणी; घरच्या वीजबिलात तीस टक्के सवलत : ठाकरेंची नवी घोषणा

राजगुरुनगर :  दहा रुपयात जेवणाच्या ताटाच्या घोषणेपाठोपाठ, एक रुपयात शिवआरोग्य म्हणजे प्राथमिक आरोग्य तपासणी आणि घरगुती वीजबिलात ३० टक्के सूट देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. पाठीवर वार करण्याची शिवसेनेची गद्दार अवलाद नाही. दोन पावले मागे येऊन युती केल्यानंतर आता छक्केपंजे नको, असा गर्भित इशारा त्यांनी भाजपचे नाव न घेता दिला. 

खेड-आळंदी मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ, येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिदषदेच्या उपसभापती डाॅ.  नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ' लढायचं तेव्हा लढलो. आता युती मनापासून केली. आम्ही १४४ - १४४ म्हणत होतो. पण चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, आमची अडचण समजून घ्या. घेतली. आता कोणी गद्दारी करीत असेल तर शिवरायांचं नाव घ्यायची त्यांची लायकी नाही. इथल्या बंडखोरी करणाऱ्या गद्दाराच्या पेकाटात लाथ घालायला शिवसेनेचे वाघ समर्थ आहेत.'  

दहा रुपयांत जेवणाचे ताट देणार म्हणून माझ्यावर टीका होत आहे. पण मी झेपणार तेवढंच बोलणारा आहे. एक रुपयात शिवआरोग्य प्राथमिक आरोग्य तपासणी आणि घरगुती वीजबिलात ३० टक्के सूट देणार म्हणजे देणार. शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार, असे ठाकरे म्हणाले. 

ठाकरे म्हणाले, ``जे शेतकऱ्याला नडले, त्या पीकविमा कंपन्यांना शिवसेना नडल्याशिवाय राहणार नाही. पिकविम्यासाठी ९० लाख शेतकरी अपात्र ठरविले गेले. त्यातून या कंपन्यांनी २००० कोटी  कमाविले. आम्ही त्यातील ११०० कोटी शेतकऱ्यांना मिळवून दिले. अजित पवार मध्येच गायब झाले. मी म्हटलं, धरणाकडं शोधा. नंतर आले आणि प्रेससमोर रडले. कशाला नाटक करता ? जनता आता भूलणार नाही,`` 

तालुक्यात ८०० कोटींची कामे केली. त्याबरोबर गुंडगिरी संपवून शांतता प्रस्थापित केली. मी लोकांना दम नाही प्रेम दिले. विकास दिला. विरोधकांकडे बोलण्याला मुद्दे ठेवले नाहीत म्हणून माझ्या रूपावर बोलू लागलेत,  असे यावेळी बोलताना सुरेश गोरे म्हणाले. 


यावेळी उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, सुलभा उबाळे, चंद्रशेखर शेटे, अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, विजया शिंदे, सुभाष तळेकर, जयप्रकाश परदेशी, ज्योती अरगडे, नंदा कड, लक्ष्मण जाधव, विलास कुर्हाडे, संतोष डोळस, रमेश शिंदे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुदाम कराळे केले यांनी आभार सुभाष मांडेकर यांनी मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com