नोटाबंदीची जुनी जखम उद्धव ठाकरे यांनी उघड केलीच

...
devendra-fadnavis-book-release on budget
devendra-fadnavis-book-release on budget

पुणे : नोटा हा अर्थकारणाचा गाभा असताना, मग तुम्ही देशातल्या नोटाच एका झटक्यात बंद करून टाकल्या .मग या नोटबंदीचा अर्थसंकल्पात समावेश व्हायला हवा होता का, नाही ?असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या अर्थसंकल्पावरील पुस्तकाच्या  प्रकाशनावेळी केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लिखित "अर्थसंकल्प - सोप्या भाषेत" या पुस्तक प्रकाशन सोहळा आज विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला विधासनसभा अध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते.

भाषणात सुरवातीलाच मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता की मला आशा विषयावर भाषण करावा लागेल.
हा प्रसंग तुमच्यामुळे आला, अशी सुरवात करून ठाकरे म्हणाे की मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावा म्हणून हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे. मित्र असल्याने ते माझी काळजी घेतात. इथे तुम्ही पाहुणे म्हणून आहात आणि दुसऱ्याच्या खर्चातून कसा आपला कार्यक्रम करायचा, हे तुम्ही दाखवून दिले आहे.

नोटबंदी हा निर्णय संबंध अर्थव्यवस्थेला दिशा देणारा होता. मग त्यासंबंधी चर्चा अर्थसंकल्पात व्हायला हवी होती. तरच लोकांना अधिक नोटाबंदीची जागृती झाली असती, असे या निमित्ताने ठाकरे यांनी विचारले.  त्याचबरोबर असेच पुढचे दहा वर्ष नवनवीन अर्थसंकल्पावरील पुस्तके लिहीत राहा, अशा शुभेच्छाही त्यांनी फडवणीस यांना दिल्या.

हे पुस्तक नवीन विधानप रिषद आणि विधानसभेतील सदस्यांना अर्थसंकल्प समजावा तसेच नागरिकांनाही किचकट अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजून घेता यावा म्हणून हे पुस्तक लिहिले आहे असे फडवणीस यांनी  आपल्या मनोगतामध्ये सांगितले. मोदी सरकारने 2017 मध्ये केलेल्या नोटाबंदीला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. त्याची खपली ठाकरे यांनी या निमित्ताने उघड केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com