महाविकास आघाडीचे सरकार आले की उद्धव ठाकरे प्रथम शिवाई देवीच्या दर्शनाला

..
atul benake talks to uddhav thackrey
atul benake talks to uddhav thackrey

नारायणगाव : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रथम किल्ले शिवनेरी येथे येऊन शिवाई देवीचे दर्शन घेणार असल्याचे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहीती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

राज्यात सत्ता स्थापनेसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाच्या आदेशानुसार शनिवारी अतुल बेनके मुंबई येथे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी प्रथम  ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन मी तुमच्या सोबतच असून तुम्हीच आमचे विठ्ठल असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत खेडचे आमदार दिलीप मोहिते,जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे आदि उपस्थित होते.

आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हॉटेल रेनिसन्स येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या वेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ, नवाब मलिक, खासदार सुप्रिया सुळे आदि उपस्थित होते.

या वेळी बेनके यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन करुण ओळख करुन घेतली. बेनके यांनी किल्ले शिवनेरीचा आमदार असल्याचे या वेळी ठाकरे यांना सांगितले. यावर ठाकरे म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्या नंतर शिवाईदेवीच्या दर्शनासाठी प्रथम किल्ले शिवनेरी येथे भेट देणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सभापती संजय काळे यांची ओळख आहे. पवार यांच्यावरील निष्ठेमुळे काळे यांनी येथील पतसंस्थेला व बाजार संकुलाला अजित पवार यांचे नाव दिले आहे. याबाबत काळे म्हणाले मी अजित पवार यांचा समर्थक आहे. मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षा सोबत जाण्याचा निर्णयामुळे मला मानसिक धक्का बसला असून अतिव दु:ख झाले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी व बाजार समितीचे संचालक शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com