नोटांना आणि फळांना थुंकी लावणाऱ्यांना सोडणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा 

-भाजीमार्केट24 तास उघडी आहेत मग गर्दी का करताय असा सवाल करीत गर्दीत अंतर ठेवून राहा असे कळकळीचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
 नोटांना आणि फळांना थुंकी लावणाऱ्यांना सोडणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा 

मुंबई : कोरोना पसारवणाऱ्या नोटाना आणि फळांना थुंकी लावणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हा इशारा नेमका कोणाला याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

महाराष्ट्रात मुद्दाम कोरोना पसरविणाऱ्यांवा ठाकरे बंधू तुटून पडले आहेत. कोरोना पसारवणाऱ्या नोटाना आणि फळांना थुंकी लावणार्याना सोडणार नाही. कोरोनपासून मी वाचवेन पण यांना कायद्यापासून कोणी वाचवू शकणार नाही असा गंभीर इशराही नियम तोडणाऱ्यांना ठाकरे यांनी दिला आहे. 

कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्यात कुठल्याही धार्मिक उत्सवाना परवानगी दिली जाणार नाही असे ठाकरे यांनी म्हटले आहे. 

कोरोनापुढे आम्ही हार कदापि हार मानणार नाही असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशलमीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना काही सूचनाही केल्या.

ते म्हणाले, की आत्मविश्वासासारखं बळ नाही. तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत असंत. महाराष्ट्रात ते बळ आहे. एकजूटीवर कोरोनावर मात करून निश्‍चितपणे जिकूं. कोरोनासमोर आपण गुडघे टेकायचे नाही, तर कोरोनाला हद्दपार करायचे असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. 

मुख्यमंत्री म्हणतात, इतकं कराच ! 
-जेथे असेल तेथे तेथेच राहा 
-गरीबांनीही तेथेच राहावे, सरकार तुमच्या पाठिशी 
-मुंबई, प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था वाढवितो 
-मुंबईकरांचे शौर्य आहे, एकजूट आहे 
-कोविडसाठी वेगळी हॉस्पिटल उभारतोय 
-निमोनिया, सर्दीपडसे असेल तर कोविड दवाखान्यात जा 
-सिंगापूरमध्ये सांगितले पंतप्रधान बाहेर जाण्यासाठी जाणार असाल तर मास्क लावण्याची गरज नाही. आपल्यापासून इतरांचा धोका टाळू शकतो 
-आपली उपकरणे घरातल्या घरात करा 
-घरातल्या घरात मानसिक अस्वस्थता आहे 
-घरातून काम करा, बाहेर पडू नका 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com