खोपोलीत रमाधाम वृद्धाश्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; ज्येष्ठांना दिली नागपूरची संत्री बर्फी

उद्धव ठाकरे यांनी रमाधाम वृद्धाश्रमाची नवीन इमारतीचे बांधकाम व अन्य पूर्णत्वास आलेल्या कामाचे जातीने पाहणी केली. या कामावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त करीत आगामी काही दिवसात ह्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे भव्य व उद्घाटन करण्यात येऊन ज्येष्ठांच्या सेवेत हजर होईल असे त्यांनी सूतोवाच केले.
Uddhav Thackeray Visited Ramadham Old Age Home in Khopoli
Uddhav Thackeray Visited Ramadham Old Age Home in Khopoli

खोपोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी खोपोली रमाधाम वृद्धाश्रमांमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच भेट देऊन तेथील ज्येष्ठांची विचारपूस केली. यावेळी खास नागपूरहुन आणलेली संत्रा मिठाई व बर्फी ठाकरे यांनी ज्येष्ठांना भेट देऊन त्यांचं तोंड गोड केले .

त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी रमाधाम वृद्धाश्रमाची नवीन इमारतीचे बांधकाम व अन्य पूर्णत्वास आलेल्या कामाचे जातीने पाहणी केली. या कामावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त करीत आगामी काही दिवसात ह्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे भव्य व उद्घाटन करण्यात येऊन ज्येष्ठांच्या सेवेत हजर होईल असे त्यांनी सूतोवाच केले.

यावेळी रमाधाम वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंदू मामा वैद्य , माजी मंत्री व आमदार रवींद्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर , रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्र थोरवे , खोपोली नगराध्यक्ष सुमन औसरमल , उपनगराध्यक्ष विनिता कांबळे -औटी जिल्हाधिकारी डॉ विजयकुमार सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक अनिल पारसकर , प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेशश चप्पलवार , तालुका प्रमुख संतोष विचारे, शहर प्रमुख सुनील पाटील आदी उपस्थित होते.

वृद्ध आश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खोपोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने खोपोली नगरपालिका कडून वसूल होत असलेल्या वाढीव घरपट्टी बाबत निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिला आघाडीच्या प्रिया जाधव व सुरेखा खेडकर यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खाजगी दौरा असला तरी, या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री प्रथमच खोपोलीत येत असल्याने शिवसेनेसह महाआघाडी चे कार्यकर्ते भेटण्याच्या आशेने सकाळपासूनच रमाधाम प्रवेशव्दारासमोर दुपार पर्यत वाट पाहत उभे होते. मात्र, सुरक्षा कारणाने पोलिसांनी याठिकाणी मोजक्याच लोकांना प्रवेश देऊन, अनेक नगरसेवकापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताटकळत प्रवेशव्दारासमोर उभे ठेवल्याने नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे बहुसंख्य नगरसेवक नगरसेविका ठाकरे यांना न भेटताच कंटाळून निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com