सावंतांना 'मातोश्री'चा दणका !

सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी आम्ही काम करू. नारायण पाटील, महेश कोठे यांना महत्त्वाचे पदे मिळू शकतात. गुरुशांत धुत्तरगावकर हे कडवट शिवसैनिक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेना वाढीसाठी कार्यरत आहेत. त्यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. - पुरुषोत्तम बरडे, प्रभारी जिल्हाप्रमुख
udhhav thackrey tanaji sawant
udhhav thackrey tanaji sawant

हे आहेत नवीन पदाधिकारी
- प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोटची जबाबदारी)
- धनंजय डिकोळे (पंढरपूर)
- सोलापूर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर
- मोहोळ तालुकाप्रमुख अशोक भोसले

सोलापूर  : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या घडामोडींनंतर शिवसेनेत बदल दिसून येत आहेत. प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांना संधी दिल्यानंतर शहरप्रमुखपदाची जबाबदारी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

संपर्कप्रमुख तानाजी सावंत, त्यांचे बंधू समन्वयक शिवाजी सावंत यांच्याबाबतची नाराजी थेट 'मातोश्री'वर पोचल्याने सावंतांना दणका बसल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शनिवारी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते "मातोश्री'वर बराच वेळ होते. सर्वांनी सावंत यांच्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांत असलेली नाराजी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखविली. सोलापुरातील शिवसेनेची सावंत सेना कशी झाली आहे याची माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आली. त्यानंतर पक्षप्रमुखांनी सर्वांशी सकारात्मक संवाद साधला.

सोलापूरचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सोलापूरचे शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, मोहोळ तालुकाप्रमुख चरणराज चवरे यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ठोंगे-पाटील यांची तर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी आमदार नारायण पाटील यांना मोठ्या पदावर संधी मिळण्याची शक्‍यता आहे. ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे पुन्हा एकदा प्रभारी जिल्हाप्रमुखपद देण्यात आले आहेत.

संपर्कप्रमुख, समन्वयक बदलणार?
शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू समन्वयक शिवाजी सावंत यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना आपल्या ताब्यात ठेवली होती. जिल्ह्यातील आधीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत त्यांचा सहभाग होता. 


मंत्रिपदावर संधी न मिळाल्याने समर्थकांच्या माध्यमातून तानाजी सावंत यांनी केलेली धडपड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत सावंत बंधूंनी भारतीय जनता पक्षाला केलेली मदत महागात पडली आहे.'मातोश्री'वरून जिल्ह्यातील आधीच्या पदाधिकाऱ्यांना दणका देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सावंत बंधूंची पदे धोक्‍यात आल्याची चर्चा आहे.

दिलीप माने झाले गायब
शिवसेनेत संपर्कप्रमुखांबद्दल नाराजीचे वादळ सुरू असताना सावंत यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आलेले माजी आमदार दिलीप माने हे सध्या गायब झाले आहेत. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा असली तरी त्यांच्याविषयी शिवसेनेचे नेते सकारात्मक नसल्याचे बोलले जात आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com