गर्दीत जाऊ नका, गर्दी होऊ देऊ नका; मुख्यमंत्र्यांचा कैलास पाटलांना आपुलकीचा सल्ला

उस्मानाबाद -कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यानी व्हॉटसअपवर पाठविलेल्या एका निवेदनाला दहाव्या मिनिटात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तुमच्या मागणीची दखल घेतल्याचा संदेश पाठवला तसेच. दुसऱ्या मिनिटात फोन करुन आमदार घाडगे पाटील यांना स्थानिक पातळीवरील माहिती विचारुन परिस्थितीचा आढावाही घेतला
Uddhav Thackeray Gives Advice to MLA Kailas Patil
Uddhav Thackeray Gives Advice to MLA Kailas Patil

उस्मानाबाद : राज्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सध्या पूर्ण क्षमतेने मैदानात उतरले आहेत. सध्या ते येणाऱ्या चांगल्या सुचनाची तातडीने कशी दखल घेत आहेत, याचाही प्रत्यय नुकताच आला. उस्मानाबाद -कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यानी व्हॉटसअपवर पाठविलेल्या एका निवेदनाला दहाव्या मिनिटात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तुमच्या मागणीची दखल घेतल्याचा संदेश पाठवला तसेच. दुसऱ्या मिनिटात फोन करुन आमदार घाडगे पाटील यांना स्थानिक पातळीवरील माहिती विचारुन परिस्थितीचा आढावाही घेतला. 

आमदार घाडगे पाटील यानी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 108 ची रुग्णवाहिका विना डॉक्टर वापरण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांची ने -आण करण्यासाठी 108 रुग्ण वाहिकेची मदत महत्वाची ठरणार आहे. सध्या रुग्णवाहिकेवर 60 ते 70 टक्के डॉक्टर नसल्याने या रुग्णवाहिका दवाखान्याच्या आवारात उभ्या आहेत. त्या वापरता येत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे.

नियमित आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. या रुग्णवाहिकांचा वापर होणे आवश्यक असल्याचे सांगुन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण ने आण करण्यासाठी 108 रुग्णवाहिका वापरण्यास आरोग्य विभागास सुचना देण्याची मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यानी निवेदनात केली आहे. हे निवेदन मुखमंत्र्यांना व्हॉटसअप पाठविल्यानंतर तातडीने दखल घेतल्याचे कैलास पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

मेसेज पाहताच उध्दव ठाकरे यांनी फोन करुन स्थानिक पातळीवरील माहिती घेतली. जिल्ह्यात बाहेरुन आलेलले दोन रुग्ण पॉझीटिव्ह सापडले असल्याने  पोलीसांना याबाबत सतर्कतेचे आदेश देण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार पाटील यांनी मुखमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही सकारात्मक प्रतिसाद संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देतो असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय फोन ठेवताना गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका असा आपुलकीचा सल्ला देत  काळजी घेण्यासही सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com