अजमेरच्या दर्ग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठवली भगवी चादर

Uddhav Thackeray to offer Chaadar to Ajmer Dargah
Uddhav Thackeray to offer Chaadar to Ajmer Dargah

मुंबई : अजमेर शरिफ ख्वाजा गरीब नवाझ यांच्या दर्ग्यात सध्या उरूस सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भगवी चादर चढवण्यासाठी पाठवली आहे. 

गेली सात वर्षे मातोश्रीवरून अजमेर शरिफला चादर पाठवली जाते. या वर्षीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेना कार्यकारणी सदस्य राहुल कनाल यांच्या हस्ते भगवी चादर मातोश्रीवरून अजमेर शरिफला पाठवली आहे. ही चादर उद्या मंगळवारी ख्वाजा गरीब नवाझ यांच्या दर्ग्यावर चढवली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चादर ख्वाजा गरीब नवाझ यांच्या दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com