Uddhav Thackeray greets Sharad Pawar on his birthday | Sarkarnama

शरद पवारांना वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा

सरकारनामा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

.

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते  शरद पवार यांच्या  वाढदिवसानिमित्त  त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्या समवेत सौ. रश्मी ठाकरे देखील होत्या . 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्री. पवार यांना 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतले. यावेळी सौ. प्रतिभा पवार , खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार, आमदार आदित्य ठाकरे, सौ.रश्मी ठाकरे, सदानंद सुळे आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख