Uddhav Thackeray Gives Chance to Rural Mla in Cabinet | Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी फिरवली सत्तेची भाकरी; मंत्री मंडळ विस्तारात गावपाड्यातील आमदारांना संधी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळात शिवसेनेच्या कोट्यात शिवसेनेतल्या प्रस्थापितांना बाजूला सारुन गावपाड्यातून आलेल्या लोकप्रतिनिधींना मंत्रीपदाची संधी दिली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळात शिवसेनेच्या कोट्यात शिवसेनेतल्या प्रस्थापितांना बाजूला सारुन गावपाड्यातून आलेल्या लोकप्रतिनिधींना मंत्रीपदाची संधी दिली आहे. शहरी भागातील दिग्गज आमदारांना बाजूला सारुन ग्रामीण भागातल्या नव्या चेहेऱ्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 

आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. यात शिवसेनेने खालील आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली आहे. 

गुलाबराव पाटील
संजय राठोड
दादा भुसे
शंभूराजे देसाई
अब्दुल सत्तार
संदिपान भुमरे
राजेंद्र पाटील-येड्रावकर

मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांतून फक्त विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनाच संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेचा पारंपारीक बालेकिल्ला असणाऱ्या  कोकणातून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना संधी 

 मिळाली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सत्तेची भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शंकरराव गडाख व बच्चू कडू या सहयोगी आमदारांनाही मंत्रीपदे देण्यात येणार आहेत.  

शिवसेनेनं या दिग्गज आमदारांना वगळले आहे की जे माजी मंत्री देखील होते.
दिवाकर रावते

रामदास कदम

तानाजी सावंत

रविंद्र वायकर

दीपक केसरकर

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख