नविन वर्षांत सरकारचा गतीमान कारभार सुरू होणार

ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशनाच्या पार्श्‍वभुमिवर तीन पक्षातील अनुभवी आणि जेष्ठ अशा सहा मंत्रयांचा शपथविधी शिवाजीपार्कवर केला. त्यानंतर लगेच नागूपरला हिवाळी अधिवेशनास जाण्याची लगबग सुरू झाली. त्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला.
Uddhav Thackeray Cabinet Expansion likely tomorrow
Uddhav Thackeray Cabinet Expansion likely tomorrow

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे पहिलेच सहा दिवसांचे छोटेखानी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून आता सारे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. हा विस्तार येत्या 24 तारखेला होणार असल्याचे समजते. त्यानंतर पुढील वर्षांत ठाकरे सरकारचा गतीमान कारभार सुरू होणार असल्याचे चित्र आहे.

ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशनाच्या पार्श्‍वभुमिवर तीन पक्षातील अनुभवी आणि जेष्ठ अशा सहा मंत्रयांचा शपथविधी शिवाजीपार्कवर केला. त्यानंतर लगेच नागूपरला हिवाळी अधिवेशनास जाण्याची लगबग सुरू झाली. त्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला. अधिवेशनानंतर ही पुढील वर्षांत याबाबत अनिश्‍चिततात असताना येत्या 24 तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे.मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरच सरकार पुर्ण क्षमतेने काम करण्यास सुरूवात करेल. तोपर्यंत हे वर्ष सरून जानेवारी 2020 ची सुरवात होईल. जानेवारी महिन्याच्या दुस-या आठवडयापासून सरकारच्या कामाला वेग येईल, अशी शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com