मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत जाऊन प्रोटोकॉल तोडला का ? 

मुख्यमंत्री ठाकरेंनी महापालिकेत स्वतः जाण्याऐवेजी आयुक्तांना मंत्रालयात का नाही बोलावले ? असा प्रश्न काही अधिकारी विचारीत आहेत .
uddhav-thakre- breaks protocol visit BMC
uddhav-thakre- breaks protocol visit BMC

मुंबई  :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी नवीन पायंडा पाडल्याची अधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका मुंबई आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन बैठक घेऊन पायंडा मोडला का ? असे या चर्च स्वरूप आहे . 
 

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यावर महापालिका मुख्यालयात दाखल झाले आणि तासभर बैठक घेतली. 

उध्दव ठाकरेंनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयात बैठक घेऊन मुख्यमंत्री पदाचा पायंडा तोडला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे . मुख्यमंत्री पदाच्या प्रोटोकॉलनुसार स्वतः मुख्यमंत्री पालिका आयुक्तांच्या केबिन मध्ये जाऊन सहसा चर्चा  करीत नाहीत  तर पालिका आयुक्त  मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि आणि बैठकीला उपस्थित राहतात .  आज झालेल्या बैठकीस  राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.  या बैठकीत    मुंबईतील प्रश्नांवर चर्चा झाली. 

राज्याचे मुख्यमंत्री एका महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयात येऊन बैठक करण्याची ही अपवादात्मक  घटना आहे.  मात्र उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मुंबई महापालिका  कार्यालयात उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री जयंत पाटील देखील उपस्थित राहिले.  मुंबईकरांच्या प्रश्नांना  झटपट न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी नवीन पायंडा पाडल्याची अधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com