उद्धव ठाकरे उद्या गोपीनाथ गडावर; नव्या समीकरणाची नांदी

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्या नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कोअर कमिट्यांच्या बैठकांना त्याची गैरहजेरी नाराजीच्या चर्चांना खतपाणी घालत आहेत.त्यातच भाजपाचा बहुजन चेहेरा असलेले दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत
Speculation about Pankaja Munde Joining Shivsena
Speculation about Pankaja Munde Joining Shivsena

पुणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊऩ मुख्यमंत्री थेट गोपीनाथ गडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडेचा शिवसेना प्रवेश होणार की त्या भाजपामध्येच राहणार या चर्चांना उधाण आले आहे. 

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्या नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कोअर कमिट्यांच्या बैठकांना त्याची गैरहजेरी नाराजीच्या चर्चांना खतपाणी घालत आहेत. दरम्यान भाजपाचे बहुजन चेहेरा असलेले दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ गडावर गुरुवारी( ता.12) होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटूंब जाणाऱ असल्याची माहिती आहे. यामध्ये रश्मी ठाकरे, आमदार आदित्य आणि तेजस ठाकरे असणार आहेत.

ठाकरे आणि मुंडे परिवाराचे ऋणानुबंध जगजाहीर आहेत. या परिवारातील स्नेहाचा ओलावा गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरही कायम आहे. या स्नेहाच्या संबधांमुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब गोपीनाथ गडावर जाणार असल्याची खात्रीशीर माहिती 'सरकारनामा'कडे आहे.

दरम्यान या कार्यक्रमात पंकजा मुंडे शिवसेना प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंडे शिवसेना प्रवेश करणार कि भाजपामध्येच राहणार याबाबत देखील तर्कवितर्क काढले जात आहेत.

उद्या तुम्हीच पहा काय होईल ते : प्रितम मुंडे

दरम्यान खासदार प्रितम मुंडे यांनी बुधवारी (ता.10)  गोपीनाथ गडावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये "उद्या तुम्हीच पहा काय होईल ते" असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com