....तर राजकारण सोडून दिले असते:  उदयसिंग राजपूत

आता निवडून आलो नाहीतर, राजकारणातून मी आऊटच होणार अशी भिती व्यक्त केली. तेव्हा शिंदे साहेबांनी, हे फक्त निवडणुकीचे तिकीट नाही, तर तुमच्या विधानसभा प्रवेशाचे तिकीट असल्याचा विश्‍वास दिला होता.
udaysingh
udaysingh

औरंगाबादः कन्नड मतदारसंघातील विजय शिवसेनेसाठी संघटना म्हणून महत्वाचा होताच, पण माझ्या राजकीय जीवनाचे पुढे काय? या प्रश्‍न चिन्हावर उत्तर म्हणून देखील आवश्‍यक होता.

हर्षवर्धन जाधव यांना पराभूत करणे फार मोठी गोष्ट नाही, कारण यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये माझा पराभव हा फार कमी मतांनी झालेला आहे. पण चौथी निवडणूक लढत असतांना जर पुन्हा पदरी निराशा आली असती तर मी राजकीय संन्यास घेतला असता ,अशा शब्दांत कन्नडचे नवनिर्वाचित शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी सरकानामाशी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.

कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात गेल्या सलग दोन निवडणुकीत विजयी झालेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव करत शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात सुरू आहे.

निवडणुकीत पराभूत झालो असतो तर? या मनातील भिती विषयी उदयसिंग राजपूत म्हणाले, माझी ही चौथी निवडणूक होती, याआधी तालुक्‍यातील मतदारांनी माझ्यावर भरपूर प्रेम व्यक्त केले, पण माझा विजय इंचा-इंचाने हुकत होता. माझ्या राजकीय आयुष्यासाठी ही शेवटची संधी होती, आता कुठल्याही परिस्थितीत यशच हवे होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. मतदारांनी मला भरभरून मतदान दिले आणि शेवटी "सबर का फल मिठा होता है' याची प्रचिती मी घेतोय.

हे विधानसभेचे तिकीट आहे..

मला उमेदवारी देण्याचा विषय निघाला तेव्हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेची आठवण नुकतीच मातोश्रीवरील आमदारांच्या भेटीत निघाली. त्याबद्दल सांगताना राजपूत म्हणाले, माझी ही चौथी निवडणूक असल्याचे मी शिंदे साहेबांना सांगितले होते. आता निवडून आलो नाहीतर, राजकारणातून मी आऊटच होणार अशी भिती व्यक्त केली. तेव्हा शिंदे साहेबांनी, हे फक्त निवडणुकीचे तिकीट नाही, तर तुमच्या विधानसभा प्रवेशाचे तिकीट असल्याचा विश्‍वास दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com