'अपक्ष' उदयसिंह पाटलांनी पृथ्वीराजबाबांचे टेन्शन वाढवले!

उंडाळकर काकांची गेली 50 वर्षे सुरू असलेली प्रस्थापितांविरोधातील लढाई मी रयत संघटनेच्या माध्यमातून पुढे नेणार आहे, असे मत उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
'अपक्ष' उदयसिंह पाटलांनी पृथ्वीराजबाबांचे टेन्शन वाढवले!

कराड :  कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र  उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कराड दक्षिण मतदारसंघातुन 1980 पासून 2009 पर्यंत तब्बल सात वेळा आमदार झालेले विलासराव पाटील उंडाळकर गेल्या 2014 च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात पराभूत झाले. यावेळी त्यांचा पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. येथून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, भाजपकडून अतुल भोसले रिंगणात आहेत. त्यामुळे कराड दक्षिणमधील तिरंगी लढत चुरशीची ठरणार आहे. मतदारसंघातील प्रस्थापित यांच्याविरोधात माझी उमेदवारी असल्याचे उदयसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com