वीस वर्षापासूनच्या प्रलंबित प्रश्‍नांना राजपूत यांनी अधिवेशनात फोडली वाचा

वीस वर्षापासूनच्या प्रलंबित प्रश्‍नांना राजपूत यांनी अधिवेशनात फोडली वाचा

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी नागपूर अधिवेशनात रस्ते, सिंचनाचे प्रश्‍न मांडत छाप पाडली. वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांना सभागृहात वाचा फोडत त्यांनी औचित्याचे मुद्दे उपस्थित केले. उदयसिंग राजपूत यांचे आमदार झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन होते. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर नागपूरातील हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार हे जवळपास निश्‍चित होते. एक आठवड्याचे अधिवेशन असल्यामुळे नवनिर्वाचित आमदारांना आपापल्या भागातील प्रश्‍न मांडून ते सोडवून घेण्याची कितपत संधी मिळेल याबद्दल साशंकता होती. परंतु शेवटच्या दिवशी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत उदयसिंग राजपूत यांनी मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्‍नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. 

अजिंठा लेणी, पितळ खोरे, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयीचे ठरावे तसेच खानदेश -मराठवाडा आणि दख्खन भागाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात यावे अशी मागणी राजपूत यांनी सभागृहात केली. मतदारसंघातील दोन रस्त्यांना हायब्रीड ऍनोटी मंजुरी दिल्यास दोन भागातील पर्यटकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

याशिवाय कन्नड-सोयगांव हा मतदारसंघ डोंगररांगातील असून या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळे राज्यमार्ग 24 वर चार नव्या पुलांची नितांत गरज आहे या बाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार मागणी केली जाते, मात्र त्यावर आतापर्यंत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. नाबार्ड योजना 25 अंतर्गत या पुलांना मंजुरी द्यावी अशी मागणी देखील राजपूत यांनी औचित्याचा मुद्दा मांडताना केली. 

प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती द्या 
मतदारसंघातील गुजरदरी उपसा सिंचन, कोटी धरण घाटशेंद्रा, सिता खोरी आणि राजु खोटा या वीस-पंचवीस वर्षांपासून प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्याची मागणी देखील राजपूत यांनी केली. या प्रकल्पांमध्ये पाणी असून देखील केवळ निधी नसल्यामुळे या पाण्याचा वापर होऊ शकत नाही. या प्रकल्पांना पुरेसा निधी मिळाला तर तीन जिल्हा परिषद गटातील दीडशेहून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. शासनाने या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा याकडे देखील राजपूत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com