udaysing rajput and aaditya thakare | Sarkarnama

कन्नड तालुक्‍यातील पर्यटन विकासासाठी साडेतीनशे कोटी द्या - उदयसिंग राजपूत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी युती सरकारच्या काळात भाजपने गंगापूर-खुल्ताबादचे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात चारशे कोटी रुपयांचा निधी दिला होता. कन्नड-सोयगांव या माझ्या मतदारसंघात गौताळा अभयारण्य, माता सिता न्हानी, पितळखोरा लेणी, किल्ले अंतूर , नायगांव किल्ला, कालीमठ प्राचीन कालीका मंदीर अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. त्यांच्या विकासासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंजुर करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन केली आहे. 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. उदयसिंह राजपूत यांनी त्यांची भेट घेऊन कन्नड तालुक्‍यातील पर्यटनस्थळांची माहिती देत या स्थळांच्या विकासासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंजुर करावा अशा मागणीचे निवेदन दिले. युती सरकारच्या काळात वेरूळ लेणे, खुल्ताबाद, म्हैस्माळ येथील पर्यटन केंद्राच्या विकासासाठी भाजप आमदार प्रशांत बंब यांना चारशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी विकासकामे देखील सुरू झाली आहेत. 

कन्नड-सोयगांव हा माझा मतदारसंघ देखील विविध पर्यटनस्थळांनी नटलेला आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळ अतंर्गत गौताळा अभयारण्य, माता सीता न्हानी, पितळखोरा लेणी, किल्ले अंतूर, नायगावचा किल्ला व कालीमठ येथील प्राचीन कालिका मंदिर अशी प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचे जतन, संवर्धन आणि विकासासाठी कृती आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून द्यावा असे देखील उदयसिंह राजपूत यांनी या निवेदनात नमूद केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख