उदयनराजे भाजपत येतीलच आणि साताराही भाजपचा बालेकिल्ला होईल

udaynraje will join bjp and satara become bjp`s fort : Atul Bhosale
udaynraje will join bjp and satara become bjp`s fort : Atul Bhosale

कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे पहिल्यापासुन आमचेच आहेत. ते राष्ट्रवादीत असूनही त्यांच्या नेत्यांनी जेवढी स्तुती केली नाही, त्यापेक्षा त्यांची जास्त स्तुती आमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे ते निश्चितच भाजपमध्ये येतील आणि सातारा जिल्हा हा आता भाजपचा बालेकिल्ला होईल, असा विश्वास विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी आज येथे व्यक्त केला. 

महापुराने बाधीत गावांसाठी सरकारकडे मागितलेल्या निधीची आणि उपलब्ध निधीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ताधारी पक्ष असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भले होवु शकते हे सर्वांना माहिती झाल्याने जसा काळ जाईल तसे अनेक मोठे नेते भाजपमध्ये आलेले दिसतील, असा दावा त्यांनी केला.

अडचणीत एखादा आला म्हणुन आम्ही त्यांना घेणार नाही, ज्यांची पाटी कोरी आहे त्यांना घेवु असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यामध्ये अनेक लोक येण्यासाठी इच्छुक होते. त्यातुन निवडून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना आम्ही घेतले आहे. खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये असताना त्यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री फडणवीस आले. त्यांच्या नेत्यांनी स्तुती केली नाही एवढी आमच्या पक्षाच्या मुख्यंत्र्यांनी केली. त्यामुळे खासदार भोसले यांच्याविषयी पहिल्यापासुन भाजप हा पक्ष सकारात्मकच आहे. त्यामुळे ते निश्चीतच भाजपमध्ये येतील आणि सातारा जिल्हा हा आता भाजपचा बालेकिल्ला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. 

जयंत पाटीलही आमच्याबरोबरच 

जयंत पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. सामाजिक कामाच्या बाबतीत राजकारणविरहीत आमची दोस्ती आहे. त्यामुळे जयंत पाटील हे ताकदीने भाजपच्या पाठिशी आज आहेत, आणि भविष्यातही राहतील, असेही अतुल भोसले यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधु जयंत पाटील हे भाजपच्या पाठीशी आहेत, हे भोसलेंचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com