उदनयराजे भाजपच्या कमळावर दोन वेळा पराभूत झाले होते....

उदनयराजे भाजपच्या कमळावर दोन वेळा पराभूत झाले होते....

सातारा : विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोट निवडणूक होत असल्याने यावेळी प्रथमच सातारचे दोन्ही राजे एकच पक्षातून एकच वेळी निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे दोघांतील मनोमिलन आता यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यानाही दाखवावे लागणार आहे. तसे झाले नाही तर एका राजाला निवडुन गमवावी लागेल.

सातारा लोकसभा आणि सातारा विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्र होत आहेत. सातारा विधानसभेसाठी भाजपमधून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि लोकसभेसाठी उदयनराजे भोसले अशी स्थिती प्रथमच होत आहे. दोन्ही राजे एकाच पक्षातून निवडणूक लढत आहेत.

उदयनराजे हे 1999 मध्ये भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार होते. त्या वेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2004 मध्ये ते भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाले होते. आता पुन्हा ते भाजपच्या चिन्हावर लोकसभेसाठी नशीब अजमावणार आहेत. 

आता यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांचे सातारा व जावलीतील बूथवर उदयनराजे भोसले यांचे बूथ एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे भाजपचे आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र बुथ असले तरी दोन्ही राजांचे बूथ सातारा विधानसभा मतदारसंघात एकत्र पाहायला मिळणार आहेत. तसे झाले तर दोघाना निवडणूक सोपी होणार आहे.

सध्यातरी दोघात मनोमिलन झालेले असले तरी या निवडणुकीत दोघांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन पाहायला मिळणार का हा महत्वाचा प्रश्न आहे. करण दोघांच्या कार्यकर्त्यांचे अद्याप तरी मनोमिलन झालेले नाही. दोघांनीही आपापल्या कार्यकर्त्यांचा एकत्र कार्यक्रम अथवा बैठक घेतलेली नाही. त्यामुळे कायम एकमेकांशी वाद घालणारे साताऱ्याचे दोन्ही राजे आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र एकाच पक्षात दिसतील पण त्यांचे कार्यकर्ते एकत्र काम करणार का, याची उत्सुकता साताऱ्यात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com