udaynaraje raje bhosale and ncp | Sarkarnama

कोंडमारा होत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली : उदयनराजे भोसले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली : मी जरी खासदार म्हणून निवडून आलो होतो तरी माझे मताधिक्‍य कमी झाले होते, त्यामुळे तेव्हापासूनच मी अस्वस्थ होतो, माझ्या मतदारसंघाचा मला विकास करायचा आहे. राष्ट्रवादी कॉंगेसमध्ये माझा कोंडमारा होत होता, त्यामुळे सगळ्यांना सांगून मी पक्षाचा त्याग केला असे वक्तव्य सातारचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत केले. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते. 

उदयनराजे यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. पत्रकारांनी त्यांना तुम्ही पक्षाच्या नेत्यांना तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पक्ष सोडताना सांगितले का ? असे विचारले असता उदयनराजे यांनी त्यांच्या खास शैलीत पत्रकारांना विचारले, माझे नाव माहित आहे का तुम्हाला ? काय नाव माझे, उदयनराजे असे स्वतःच उत्तर देऊन ते म्हणाले, की मी कुठलाही गोष्ट लपून छपून करत नाही, जे काही करतो ते उघडपणे करतो, त्यामुळे सगळ्यांना सांगूनच मी पक्षांतर केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख