पवारांनी  उदयनराजेंची 'सॅम्पल केस' केल्याने नवे आमदार फुटण्यास तयार नाहीत ? 

Udayanraje - Sharad Pawar
Udayanraje - Sharad Pawar

मुंबई  : कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार पाडण्यात भाजपकडून "आँपरेशन लोटस" पार पाडण्यात आले. त्यात सहभागी झालेल्या 17 आमदारांचे राजकीय भवितव्य आजही टांगणीला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप मध्ये गेलेले अनेक दिग्गज शरद पवारांनी पाडले आहेत . 

 राज्यात उदयनराजेंच्या  झालेल्या  पराभवाने  कॉंग्रेस ,राष्ट्रवादीसह शिवसेनेचा कोणताच आमदार फुटण्याची हालचाल करणार नसल्याचे मानले जाते.

स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी 145 चा जादूई आकडा नसल्यामुळे भाजपला इतर पक्षांची साथ घ्यावीच लागणार आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपचाच मुख्यमंत्री होणार यसाठी जंगजंगपछाडणा-या भाजपला शिवसेनेच्या नाकदु-या काढताना 14 दिवसाचा कालावधी उलटला आहे.

तरीही राजकीय अनिश्‍चितता असून शिवसेनेने सत्ता सहभागाबाबत कोणताही "ग्रीन सिग्नल' दिला नसल्याचे समोर येत आहे. 

या दरम्याने भाजपाने अपक्ष आमदारांपासून ते कॉंग्रेस ,राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या देखील आमदारांना गळ टाकण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे सांगितले जाते. काही दिवसापुर्वी कर्नाटकातील मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकार पाडताना "आँपरेशन लोटस" पार पाडले होते. याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील अशी मोहीम फत्ते करता येते का याची चाचपणी भाजपने केली मात्र त्यात यश आले नाही. 

याला कर्नाटक मधील आँपरेशन लोटसच कारणीभूत ठरले आहे. कारण कर्नाटकातील जे 17 आमदार फूटले होते. त्यांना तत्कालिन विधानसभा अध्यक्षांनी बडतर्फ करून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे.पक्षांतर बंदी कायदा मोडला असल्याने त्यांना निवडणुकीसाठी लढता येत नाही. बाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.हे ताजे उदाहरण डोळ्यांसमोर आसताना शिवसेना,कॉंग्रेस ,राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार भाजपच्या गळाला लागणे अशक्‍य असल्याचे मानले जाते. 

शिवाय शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप मध्ये गेलेले अनेक दिग्गज शरद पवारांनी पाडले आहेत .राज्यात उदयनराजे, पिचड आदी पक्षांतर केलेल्यांचा   झालेल्या  पराभवाने  भाजपच्या गळाला कोणी लागताना दिसत नाही . त्यामुळेच भाजपच्या मेगाभरतीला मोठे ब्रेक लागले आहे. 

त्यातच कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर त्याच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार देण्यात येईल.त्यामुळे नुतन आमदारांना गळाला लावणे इतके सोपे नसल्याचे सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com