`तुम्ही सातारच्या दोन राजांना खूप पळविले आहे...`

`तुम्ही सातारच्या दोन राजांना खूप पळविले आहे...`

सातारा : पालिका निवडणूकीत साताऱ्याच्या राजघराण्यातील काडीमोड झालेल्या मनोमीलनाची चर्चा पुन्हा जोमाने सुरू असतानाच आज (रविवार) खासदार छत्रपती उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा रनर्स फाउंडेशनच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सकाळीच एकत्र आले होते. त्यावेळी दोघा बंधूनी "व्हिक्टरी " अशी निशाणी दाखवून पुन्हा एकदा मनोमिलनाचा संकेत दिले.

दोघांच्यात आजून अबोला कायम असला तरी एकत्र मंचावर हे दोघे येत असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. यावेळी साताऱ्यातील रनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराज साहेब तुम्ही थोडी रन करा म्हटल्यावर उदयनराजे म्हणाले,  तुम्ही आम्हाला दोघांना एवढे पळवले आहे. आता पळवू नका असा चिमटा काढल्यावर सगळीकडे एकच हशा पिकला.

सातारा जिल्ह्यात शनिवारपासून (ता.26) सातारामधील राजकारणात एक वेगळीच उलथापालथ दिसून आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हेलिकॉप्टरने सातारामध्ये आले. त्यांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वाहन तयार होते. श्री. पवार यांचे हेलीपॅडवर स्वागत झाल्यानंतर त्यांनी खासदार उदयनराजे भोसलेंना बोलावून या गाडीत बसा असे सांगितले. कार्यक्रमस्थळी पवार साहेबांसोबत शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे हे एकाच गाडीतून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी या दोन्ही नेत्यांची उपस्थिती होती. परंतु त्यांच्यात संवाद नव्हता. दरम्यान शहरात शनिवारी (ता.26) दिवसभर राजे एकत्र आले...मनोमीलन झाले...असे प्रत्येकाच्या कानावर पडत होते.

आज (रविवार) सकाळच्या प्रहरी यवतेश्‍वर येथे एका कार्यक्रमास दोन्ही नेते आले होते. विशेष म्हणजे छायाचित्रकरांना पोझ देण्यासाठी क्षणभर का होईना दोन्ही नेते एकत्र आले. छायाचित्र काढताना दोघांचे व्हिक्‍टरीचे चिन्ह आणि उदयनराजेंची प्रसन्न मुद्रा हे खूप काही सांगून जात आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मनोमीलन झाले आहे हे त्यांच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com