उदयनराजे समर्थकांनी रामराजेंचा पुतळा जाळला 

.
Satara-raje-Vs-Nimbalkar
Satara-raje-Vs-Nimbalkar

सातारा :  खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी शब्दांत टीका केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज पोवई नाक्‍यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे दहन केले. 

खासदार उदयनराजे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोणी अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन टीका करत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नितीन शिंदे  आणि संतोष घाडगे यांनी या वेळी दिला. अशा प्रकारची बेताल वक्तव्ये यापुढे कोणी केली, तर साताराच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. 

काल फलटण येथे धेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. रामराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करताना त्यांचा चक्रम असा उल्लेख केला होता. त्याचा निषेध म्हणून आज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला. 

खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे यांच्यात जुना राजकीय संघर्ष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका रामराजे आणि काही आमदारांनी घेतली होती. मात्र, पक्षाध्यक्ष पवार यांनी सगळ्यांची समजूत काढत उदयनराजे यांनाच उमेदवारी दिली होती. नीरा-देवधरच्या पाण्याच्या मुद्‌द्‌यावरून आता पुन्हा या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com