उदयनराजेंचे पुत्र वीरप्रतापराजेंचे स्कुबा डायव्हिंगमध्ये यश - Udayanraje Son Masters in Scuba Diving | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंचे पुत्र वीरप्रतापराजेंचे स्कुबा डायव्हिंगमध्ये यश

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 सप्टेंबर 2019

छत्रपती शिवाजी महाराजाचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलमुळे परिचित आहेत. आता त्यांचे पुत्र वीरप्रतापराजे यांनी थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत यश मिळवले आहे.

सातारा - छत्रपती शिवाजी महाराजाचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलमुळे परिचित आहेत. आता त्यांचे पुत्र वीरप्रतापराजे यांनी थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत यश मिळवले आहे.

उदयनराजे भोसले यांचे सुपुत्र वीरप्रतापराजे यांनी देखील आपल्या वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत वयाच्या 14 व्या वर्षी यश मिळवले आहे. नुकत्याच थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेऊन अवघ्या चौदाव्या वर्षी प्रमाणपत्र मिळवले आहे.

या यशाबद्दल उदयनराजेंनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. या संदर्भात एका वृतवाहिनीशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, ''मी माझ्या मुलाला असं ट्रेन्ड केलं आहे की, तो माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांची काळजी घेईल. स्कुबा डायव्हिंग हा त्याचा छंद आहे, त्याने आज ही कामगिरी केली याचा सार्थ अभिमान आहे.''उदयनराजे भोसले यांना दोन मुलं असून मोठा मुलगा वीरप्रताप तर दुसरी मुलगी नयनतारा. वीरप्रताप हा सध्या चन्नई येथे शिक्षण घेत असून मुलगी नयनतारा ही पुण्यात शिक्षण घेते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख