उदयनराजे म्हणाले, इथं माझं मला पडलय ......

उदयनराजे म्हणाले,आता कोणाची मागणी करु ? कोणाचे नाव घ्यायचे ?सगळे जवळचे आहेत .सगळेच मित्र मंडळी आहेत.नंतर हसत हसत उदयन राजेम्हणाले , नाही तर चिठ्ठ्याचंटाकुयात !
udayanraje Bhosale
udayanraje Bhosale

सातारा : इथं  माझ मला पडलय  आणि तुम्ही काय विचारता सरकार कोणाचे  येणार ? अशी प्रतिक्रिया भाजपवासी  झालेल्या उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

उदयनराजेंना  पत्रकारांनी विचारले की सरकार कोणाचे येईल?  तुम्हाला काय वाटते ? त्यावर उदयनराजे हसत हसत म्हणाले, मला काय वाटते काय विचारता?  माझं मला पडले आहे. त्यानंतर हसत हसत ते म्हणाले, रामदास आठवले म्हणतात ते बरोबर आहे . त्यांचे होत नाही तोपर्यंत मलाच करा ना ! तुमचे आधी काय ते  ठरवा . काय तो निर्णय घ्या . 


त्यानंतर थोडे गंभीर होत उदयनराजे म्हणाले,  थोडी ताणाताणी होणारच पण शेवटी होईल.  आता काय प्रत्येकाला खात्याच  असतं . खातेवाटप चांगले व्हावे .  आपल्याला चांगले खाते मिळावे असे  प्रत्येकाला वाटत असतं . ते स्वाभाविक आहे.  भाजपाला जसे वाटते आपल्याकडे महत्वाचे खाते असावे  तसेच  त्यांचे मित्रपक्ष शिवसेना आरपीआय यांनाही  असं वाटतं की, आपला पक्ष वाढण्या करता एखादे  चांगले  खाते मिळाले तर बरे होईल . आपल्याला काम करता येईल.  लोकांची कामे करता येतील . या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येईल

आपण दोन्ही पक्षांना काय सल्ला देणार असे विचारले असता ते पुन्हा हसत हसत म्हणाले,  सल्ला देण्याइतका मी मोठा नाही ते तज्ञ आहेत सल्ला देणारे आहे . ते निर्णय नक्कीच घेतील . त्यांचे बोलणे सुरू आहे . त्यांचा  निर्णय होईल. 


सातारा जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे तुम्ही कोणाच्या नावाची मागणी करणार असे विचारले असता उदयनराजे म्हणाले,  आता कोणाची मागणी करु ? कोणाचे नाव घ्यायचे ?  सगळे जवळचे आहेत .  सगळेच मित्र मंडळी आहेत.  नंतर हसत हसत उदयन राजे म्हणाले , नाही तर चिठ्ठ्याचं  टाकुयात !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com