`जिंकलो नाही पण संपलोही नाही`

`जिंकलो नाही पण संपलोही नाही`

सातारा : आज हरलो आहे, पण थांबलो नाही, जिंकलो नाही, पण संपलो ही नाही. या पुढेही सदैव आपल्या सेवेशी कायम राहणार असल्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे.

उदयनराजे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून साताऱ्यातील जनतेला आवाहन केले आहे. सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्वांचे लक्ष उदयनराजे यांच्या प्रतिक्रियेकडे लागले होते. आपल्या चाहत्यांना त्यांनी ट्विट करून संदेश दिला आहे.

ते म्हणतात, लोकसभा पोटनिवडणुकीत मला मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार!मी सदैव आपल्या सेवेशी तत्पर राहणार आहे. आज हरलो आहे, पण मी थांबलो नाही. जिंकलो नाही पण संपलो ही नाही....असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com