उदयनराजेंनी अमित शहांना दिली तलवार भेट

udayan-raje-Amit-Shah.
udayan-raje-Amit-Shah.

सातारा : कऱ्हाड येथील जाहिर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उदयनराजे भोसले यांनी रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांसह शिवमुद्रेची प्रतिकृती, तलवार आणि सातारी कंदीपेढे देऊन स्वागत केले. यावेळी अमित शहा यांनी तलवार उंचावरून सर्वांना अभिवादन केले.


 यावेळी उपस्थितांनी एक नेता एक आवाज ,उदयन महाराज उदयन महाराज अशा घोषणा दिल्या. तसेच मोदी..., मोदी..असा नामगजरही झाला . 


यावेळी अमित शहा म्हणाले, साताऱ्याच्या या ऐतिहासिक भुमीत आल्याचा मला आनंद होत आहे. छत्रपतींनी गुलामीच्या कालखंडाला तोडून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. येथूनच छत्रपतींनी स्वराज्याचा संदेश देशभर पोचविला. या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भुमीला मी वंदन करतो. कोयना, कृष्णाकाठी वसलेल्या या कऱ्हाड नगरीला मी अभिवाद करतो. 


आज आपल्या व्यासपीठावर उदयनराजे भोसले आहेत, याचा आनंद मला होता आहे. कारण छत्रपतींच्या सिध्दांतावर आमचा पक्ष चालतो हे यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. उदयनराजे भाजपमध्ये येत आहेत. यावर मी त्यांना दिल्लीत आणा स्वत:च्या हाताने मला त्यांचा भाजप प्रवेश घ्यायचा असे सांगितले. त्यानुसार त्यांचा दिल्लीत सन्मानाने भाजप प्रवेश घेतला. आता साताऱ्यातून लोकसभेच्या निवडणुक रिंगणात आहेत. त्यांना विक्रमी मतांनी निवडुन द्या, असे आवाहन श्री. शहा यांनी  केले.


उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या वतीने अमित शहा यांचे स्वागत करतो. छत्रपतींनी कधी सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली, स्वराज्य आणि देशाच्या अखंडतेचा विचार दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या अखंडतेकडे कोणी लक्ष दिले नाही. सातारा जिल्ह्यातील भुमित अनेक चळवळी निर्माण झाल्या. देशाच्या संरक्षणाची चळवळ या भुमित जन्माला आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com