Udayanraje to meet sharad pawar shortly | Sarkarnama

उदयनराजे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला

अमोल कविटकर
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (ता. 12) थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर राजे हे परत पवारांशी चर्चा करण्याच्या वृत्तानंतर ते राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षात काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही, असेही सांगण्यात आले.

उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची गेले महिनाभर चर्चा आहे. त्यातून भाजप नेतेही तशा पद्धतीची वक्तव्ये करत असतात. उदयनराजेंनी काही अटी प्रवेशासाठी घातल्याचेही त्यांच्या गोटातून सांगण्यात येते. राष्ट्रवादीकडूनही त्यांची मनधऱणी सुरू आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेणार, याची राज्यात उत्सुकता आहे.

शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी उदयनराजे त्यांना भेटणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख