Udayanraje Instructs Police to be Judicious | Sarkarnama

प्रत्येकाची चौकशी करूनच पोलिसांनी नागरिकांना वागणूक द्यावी : उदयनराजे भोसले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वानी घरी थांबून संसर्ग रोकावा, यासाठी पोलीस दिवस रात्र सक्रिय आहेत. पण काही ठिकाणी विनाकारण मारहाणीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलीसांना काही सूचना केल्या आहेत

सातारा : काम नसणाऱ्या आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर आलेल्या लोकांना पोलिसांकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत. प्रत्येकाला एकाच मापात मोजता येणार नाही. प्रत्येकाची चौकशी करून त्यांना वागणूक मिळावी, अशी सूचना सातारचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस प्रशासनास केली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वानी घरी थांबून संसर्ग रोकावा, यासाठी पोलीस दिवस रात्र सक्रिय आहेत. पण काही ठिकाणी विनाकारण मारहाणीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलीसांना काही सूचना केल्या आहेत.

उदयनराजे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील पोलीस बांधव दिवस रात्र महाराष्ट्र वासीयांच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. काम नसताना घराबाहेर पडणाऱ्यांना मारहाणीच्या घटना आपण पाहत आहोत. पण प्रत्येकाला एकाच मापात मोजता येणार नाही अत्यावश्यक कामासाठी बाहेर आलेल्या लोकांना पण मारहाणीच्या घटना होत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. रस्त्यावर येणाऱ्या लोकांची योग्य ती चौकशी करूनच त्यांना वागणूक मिळावी. भाजीपाला, किराणा, दुध, मेडिकल, ATM मध्ये जायचं असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता पोलीस बांधवांनी सहकार्य करावे व आपले कर्तव्य पार पाडावे.

देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याच अनुषंगाने रोजगारावर पोट भरणाऱ्या देशातील ८० कोटी गरजू लोकांना दर महिन्याला दोन रुपयांना गहू आणि तांदूळ फक्त तीन रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे जनतेच्या वतीने मी आभार मानतो, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख