udayanraje enter into bjp | Sarkarnama

...आणि पक्षप्रवेशाचे ट्विट केले स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी आपल्या कार्यपद्धतीनुसार सगळ्यांना धक्का देत थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे ट्विट करून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या सगळ्या शंकांना पूर्णविराम दिला. 

साधारण दुपारी 2 च्या सुमारास छत्रपती उदयनराजे यांनी ट्विट करून आपल्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, " आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली, अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.' राजे यांच्या ट्विटर अकौटंवर याआधीच्या घडामोडींबद्दलचेही विविध ट्विट दिसत आहेत. गेल्या चार पाच दिवसात महाराजांबाबत विविध स्वरुपाच्या ज्या घडामोडी झाल्या त्याची कल्पना या ट्विटरअकौटवरून येते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख