udayanraje challenges shivsena | Sarkarnama

`शिवसेना हे नाव बदलून ठाकरेसेना करा कोण तुमच्या मागे येते पाहा`

उमेश घोंगडे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

खासदारकी गेली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. स्वत:ला मनापासून जे पटते त्यावर विचार करूनच निर्णय घेतो. त्यामुळेच खासदारकीचा राजीनामा दिला. आता खासदारीकी असो वा नसो लोकांची सेवा करीत राहणार, असे उदयनराजे यांनी सांगितले.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ राजकाणाची पोळी भाजण्यासाठी घेतले जात आहे. शिववडा नावाने वडापावसुद्धा महाराजांच्या नावाने विकली जातो. हा महाराजांचा अपमान नाही का असा प्रश्‍न करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सोडा; आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार काही प्रमाणात तरी आचरणात आणा, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला.हिंमत असेल तर शिवसेना हे नाव बदलून ठाकरेसेना करा कोण तुमच्या मागे येते पाहा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले.

"आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाबाबत भूमिका स्षष्ट करण्यासाठी छत्रपती उदयनराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्हणाले "" छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतर कुणाशी करणे आयोग्यच आहे. त्याचा की निषेधच करतो. मात्र, महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना कोण आवरणार. शेतकऱ्यांचे प्रश्‍न इतके भीषण असताना सरकार काहीच करताना दिसत नाही. प्रत्येकवेळी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यासाठी त्यांचे विचार आचरणात आणावे लागतील. मुळात स्वत:च्या स्वार्थासाठी महाराजांच्या नावाचा उपयोग केला जातोय. अन्यथा शिवसेनेऐवजी ठाकरेसेना असे नाव दिले तर यांच्याकडे कुणीही येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेनेला खरोखरीत किंमत असती तर मुंबईतील शिवसेना भवनावर लावलेल्या चित्रांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली महाराजांचा फोटो यांनी लावला नसता.''

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे थेट नाव न घेता पट्टा नसलेले काही कुत्री असतात, अशी टीका उदयनराजे यांनी केली. त्यांचे नाव घेऊन त्यांना मोठे करू इच्छित नाही. मात्र. त्यांनी आपली लायकी ओळखून राहावे. आता तुमची वेळ संपली. याद राखा आमचे नाव घेतले तर परिणाम काय होतील, सांगू शकत नाही, या शब्दात त्यांनी एकप्रकारे दम भरला.

खासदारकी गेली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. स्वत:ला मनापासून जे पटते त्यावर विचार करूनच निर्णय घेतो. त्यामुळेच खासदारकीचा राजीनामा दिला. आता खासदारीकी असो वा नसो लोकांची सेवा करीत राहणार, असे उदयनराजे यांनी सांगितले.

जेम्स लेन प्रकरणात आम्ही न्यायालयात लढत होतो तेव्हा शिवसेना कुठे होती, असा प्रश्‍न छत्रपती उदयनराजे यांनी केला. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना संघटना काढली तेव्हा आम्हाला विचारले होते का असाही सवाल त्यांनी विचारला. भिवंडीची दंगल घडवण्यामागे कोण होते. याची माहिती जाणत्या राजांनी घ्यावी, असा प्रश्‍न त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख