...आणि त्यामुळे उदयनराजे साजरा करणार नाहीत वाढदिवस

...आणि त्यामुळे उदयनराजे साजरा करणार नाहीत वाढदिवस

सातारा : बळीराजाच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती यासह अनेक बाबींचा विचार करुन, 24 फेब्रुवारीचा आपला वाढदिवस, साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

आपल्या पत्रकात ते म्हणतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर प्रेम करणा-या व्यक्तींनी, आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये, असे स्पष्ठ करून उदयनराजे यांनी म्हटले की, वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरत असते. खरंतर आम्हास मूलतः वाढदिवस साजरा करण्याची तीव्र इच्छा नसते. परंतु आमच्यावर प्रेम करणा-या लाखो-करोडो मनांचा उत्साह पाहिल्यावर या सर्वांचा व्यक्तींच्या मनाचा आदर ठेवण्याकरीता यापूर्वी एक-दोन वर्षे सोडून, अनेक वेळा साजरा केलेला आहे. अश्‍यावेळी, आम्ही, आमच्या वाढदिनाचे औचित्य साधून, जनसेवेच्या कामांचा शुभारंभ अथवा जनसेवेच्या कार्याची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तथापि अलीकडच्या काळात, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या आत्महत्या काही केल्या थांबलेल्या नाहीत. तसेच सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पहाता, आमचा वाढदिवस साजरा करणे आम्हास उचित वाटत नाही. 

आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पध्दतीने साजरा करु नये, त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्‍यक गरजांच्या पूर्ती करीता परस्पर त्यांना मदत करावी, अशी आमची 
आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत, असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com