शरद पवार साताऱ्यातून लढले तर मी फॉर्मच भरणार नाही : उदयनराजे (व्हिडिओ)

शरद पवार साताऱ्यातून लोकसभेला उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही. पण त्यांनी एकच करावे दिल्लीतील त्यांचा बंगला आणि गाडी वापरायची मुभा तेवढी द्यावी, असे प्रतिपादन माजी खासदार व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, पवारसाहेबांकडून तुमच्यावर टीका होतेय याचे वाईट वाटते का, या प्रश्‍नावर मात्र, उदयनराजे भावनिक झाले.
Udayanraje - Sharad Pawar
Udayanraje - Sharad Pawar

सातारा : शरद पवार साताऱ्यातून लोकसभेला उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही. पण त्यांनी एकच करावे दिल्लीतील त्यांचा बंगला आणि गाडी वापरायची मुभा तेवढी द्यावी, असे प्रतिपादन माजी खासदार व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, पवारसाहेबांकडून तुमच्यावर टीका होतेय याचे वाईट वाटते का, या प्रश्‍नावर मात्र, उदयनराजे भावनिक झाले. ''ते आदरणीय नेते असून काल, आज आणि भविष्यातही आदरणीय राहतील. आज मला माझ्या वडीलांची आठवण येते त्यांच्यानंतर श्री. पवारसाहेबांनी मला प्रेम दिले," असे म्हणत उदयनराजेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

लोकसभेची पोटनिवडणुक जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यावर सर्वबाजूने टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ''ऐन तारूण्याचे दिवस मी वाया घालविले आहेत. पवार साहेबांविषयी आदराने बोलतो, त्यांच्याविषयी खूप आदर आहे. नवाब मलिकांविषयीही आदर आहे. पण कधीतरी अंतरमनात झाकून बघा, मग कळेल. मी स्वाभिमान सोडलेला नाही. कोणी काहीही बोलायचे आणि ऐकूण घ्यायचे मी बांगड्या भरलेल्या नाहीत. हिंमत असेल तर माझे चॅलेंज स्वीकारा आणि समोरासमोर या. बोललो ते बोललोच. झाल्यात माझ्यावर केसेस, पण लोकांना केसेस माहिती आहेत, त्या का झाल्या ते माहिती नाही. अन्यायाविरोधात आवाज उठविला म्हणून माझ्यावर केसेस झाल्याने मी तुरूंगात होतो. ऐन तारूण्यातील 22 महिने घालविली.'' या लोकांना ही सर्व नौटंकी वाटते. पण नौटंकी तर नौटंकी..उगीच लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत, असेही त्यांनी नमुद केले.

साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत पवार यांचेचे नाव येत आहे. या प्रश्‍नावर ते म्हणाले, ''पवार साहेब उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही. पण त्यांनी एकच करावे दिल्लीतील त्यांचा बंगला आणि गाडी तेवढी वापरायची मुभा द्यावी,'' ते पुढे म्हणाले, "तुम्ही म्हणाल तर चांगले आहे. खरच त्यांनी उभे राहावे. देवा शपथ सांगतो, मी बोंबलत हिंडायला मोकळा, एकदा आजमावून बघा. याला म्हणतात स्टाईल ईज स्टाईल..असे म्हणत उदयनराजेंनी कॉलर उडविली. 

''त्यांनी सांगू देत नाही ऐकले तर काही हरेन. देवेंद्र, गिरीश महाजन यांच्याशी माझी मैत्री आहे. मी त्यांना काहीही मागितले नाही. केवळ एकच मागितले. साताऱ्यासाठी सर्व काही करा. एक अख्खी पिढी वाया गेली. एक जनता म्हणून तुम्ही विचारणार का त्यांना, त्यांच्या जमिनी गेल्या त्यावेळी सत्ता आमची होती. करून करून काय केले. त्यामुळे चर्चा कशाला कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकीन...''असे स्पष्ट करत इश्‍युबेस राजकारण करण्याऐवजी समाजकारण करा लोक दुवा देतील, असा सल्लाही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com