udayanraje annunces bjp entry | Sarkarnama

उदयनराजेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा

अमोल कविटकर
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार छत्रपत्री उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा आज दुपारी दोन वाजता ट्विटरवरून केली. विकासासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रवेश होणार असल्याचे राजेंनी जाहीर केली. 

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार छत्रपत्री उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा आज दुपारी दोन वाजता ट्विटरवरून केली. विकासासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रवेश होणार असल्याचे राजेंनी जाहीर केली. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत. राजेंनी या ट्विटमध्ये पंतप्रधान, अमित शहा आणि फडणवीस यांनाही टॅग केले आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत महिनाभर अटकळी होत्या. ते कधी मुख्यमंत्र्यांना तर कधी शरद पवारांना भेटत होते. त्यामुळे त्यांचा निर्णय काय होणार, याची उत्सुकता होती.

अखेरीस पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची अट त्यांनी टाकली. भाजपने ती तात्काळ मान्य केली. ते राजे आहेत, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार  भाजपने त्यांना राजेशाही ट्रिटमेंट दिली. आता उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे तीनही राजे आता भाजपच्या गोटात समाविष्ट झाले आहेत. 

उदयनराजेंनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा सोडून उदयनराजेंना घेऊन दिल्ली गाठणार आहेत.

उदयनराजेंना दिल्लीला नेण्यासाठी मुख्यमंत्री आज (शुक्रवार) संध्याकाळी पुण्यात येत असून उद्या सकाळी (शनिवार) पुण्यातून काष्टी गाठत पुन्हा महाजनादेश यात्रा सुरू करणार आहेत.

गेला महिनाभर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत होती. मात्र गुरुवारी सकाळी उदयनराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतच राहतील, अशी अटकळ बांधली गेली. मात्र पवारांच्या भेटीनंतर अवघ्या पाचच तासात उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची बातमी पुन्हा समोर आली.

आज रात्री ते खासदारकीचा राजीनामा देणार असून उद्या सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती उदयनराजे 'जय श्रीराम' करणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे आज संध्याकाळी खास विमानाने पुण्यातून दिल्लीला पोहोचणार आहेत. प्रवेशानंतर दोघेही पुन्हा पुण्याकडे येणार असून मुख्यमंत्री फडणवीस माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावातून महाजनादेश यात्रा सुरू करणार आहेत. त्यामुळे उद्या (शनिवारी) सकाळी नगरला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद रद्द होण्याची दाट शक्यता आहे. कारण पुण्यावरून मुख्यमंत्री थेट काष्टीला जाणार असून काष्टीमध्ये हेलिपॅडची तयारी सुरू करण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख