शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसोबत असेन : उदयनराजे

शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसोबत असेन : उदयनराजे

सातारा : राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो. हीच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो. तुमच्यासाठी कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेन, असा विश्वास माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. 

भाजप प्रवेशानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील जनतेला ट्टिटरवरून भावनिक आवाहन केले आहे. भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात आज सकाळी भाजप व उदयनराजे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवईनाका येथील पुतळ्याजवळ एकत्र येऊन जल्लोष केला. तसेच एकमेकांना पेढे भरवून उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशाचे समर्थकांनी स्वागत केले. यावेळी सर्वांनी एक नेता "एक आवाज उदयनमहाराज , उदयनमहाराज' अशा घोषणा दिल्या. 
याच दरम्यान उदयनराजे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून जनतेला भावनिक आवाहन केले. 

त्यांनी म्हटले की, राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो, हिच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच मनोमन इच्छा. तुमच्यासाठी काल ही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासा पर्यंत असेन. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com