उदयनराजे राष्ट्रवादी सोबतच राहणार ?

उदयनराजे राष्ट्रवादी सोबतच राहणार ?

सातारा : विधानभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होण्याबाबत केंद्र व राज्य सरकार काहीही करू शकत नाही. त्यामुळे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश लांबणीवर गेला आहे. कदाचित ते राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय समर्थकांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपात जात आहेत. गेले महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर अलिकडेच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. 

त्यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते, त्याचाच एक भाग म्हणून शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख व खासदार डॉ. अमोले कोल्हे यांनी अलिकडेच त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी न सोडण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही उदयनराजे हे भाजप प्रवेशावर ठाम होते.

विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक घेण्याच्या अटीवर त्यांनी लगेच भाजपात प्रवेश करण्याचे कबूल केले होते. गेले दोन दिवस उदयनराजे पुणे व मुंबईत तळ ठोकून होते. परवा काही निवडक कार्यकर्त्यांशी त्यांनी भाजपा प्रवेशाबाबत चर्चा केली. या चर्चेतून भाजपात न जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला होता.

काल उदयनराजे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत उदयनराजे यांची लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत घेण्याची अट मान्य करणे भाजपला अडचणीचे असल्यानेही चर्चा असफल ठरली. त्यामुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडलाआहे. तर ते राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यानी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com