नेवासे मतदारसंघात होतोय 'उदयन'चा उदय - Udayan Gadakh New Leader in Newase Tehsil | Politics Marathi News - Sarkarnama

नेवासे मतदारसंघात होतोय 'उदयन'चा उदय

विनायक दरंदले 
गुरुवार, 25 जुलै 2019

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा नातू व माजी आमदार शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांनी वयाच्या एकविशीतच नेवासे तालुक्यात युवकांचे मोठे संघटन करुन आपला पाया स्वतःच्या पायावरच उभा करण्यास सुरुवात केली आहे. युवा उदयन यांचा उदय राजकीय कलाटणी देणारा ठरु शकतो.

सोनई (नगर) : जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा नातू व माजी आमदार शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांनी वयाच्या एकविशीतच नेवासे तालुक्यात युवकांचे मोठे संघटन करुन आपला पाया स्वतःच्या पायावरच उभा करण्यास सुरुवात केली आहे. युवा उदयन यांचा उदय राजकीय कलाटणी देणारा ठरु शकतो. नुकत्याच झालेल्या सोनई येथील आंदोलनाचे नेतृत्त्व करून उदयन यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. आगामी काळात नेवाश्याचे उदयनराजे होण्याची स्वप्ने त्यांना पडत नसतील, तर नवलच.

जानेवारी २०१७ साली माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुनच होत असलेली दगाबाजी व होणारी घुसमट लक्षात घेवून क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली. पक्षाने सर्वप्रथम जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक बॅट या चिन्हावर लढविली. याच निवडणुकीच्या निमित्ताने उदयन गडाख यांनी सर्व गटात प्रचार करत युवकांची जुळवाजुळव सुरु केली. त्यावेळी ते एकोणीस वर्षांचे होते.

बीबीए, एमबीए शिक्षण घेतेलेल्या उदयन यांनी पुढे सोनई, चांदा, खरवंडी गटात घरोघर जावुन युवकांचे प्रश्न जाणून घेतले. यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध विषयांवर काम सुरु केले. माजी उपसरपंच उदय पालवे सह युवकांच्या बैठका घेतल्या. युवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबीर,क्रिकेट स्पर्धा सह सामाजिक कामास सुरुवात केली.

सहा महिन्यांपूर्वी वांजोळी व परीसराला वांबोरी चारी योजनेतून पाणी मिळण्यासाठी अंदोलन झाले. त्यावेळी उदयन युवकांसह रस्त्यावर उतरले होते. पुढे सोनईसह अठरा गावाची पाणी योजना सुरु होण्याकरीता झालेल्या रास्तारोको अंदोलनात परीसरातुन पाचशेहून अधिक युवक जमा झाले होते. या युवकांचा आंदोलनात दरारा दिसला. दोन दिवसापूर्वी परीसरातील शंभर युवक शिवाजी चौकात उपोषणास बसले. या उपोषणाच्या दडपणाने प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने युवा टीम चर्चेत आली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख