किंग इज कमिंग बॅक...उदयनराजे मंत्री होणार !

किंग इज कमिंग बॅक...उदयनराजे मंत्री होणार !

सातारा : लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा ताकद देण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी केली आहे. 

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रातील मंत्रीपद आणि फेब्रुवारीत त्यांना राज्यसभेवर घेऊन उदयनराजेंचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे उदयनराजेंचे लवकरच किंग इज कमिंग बॅक... होणार आहे.

सातारा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून विजयी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी चारच महिन्यात जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्‌द्‌यावर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालून उदयनराजेविरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना निवडुन आणले. 

उदयनराजेंना पराभव पत्करावा लागला. आता छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयनराजेंबाबत भाजपकडून कोणता निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता जिल्ह्यात आहे. सध्या महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असून कोणत्याच पक्षाकडून सरकार स्थापन करण्याची भुमिका घेतली जात नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे उदयनराजेंबाबत भारतीय जनता पक्षाकडून कोणतीच भुमिका घेतली गेलेली नाही.

 मात्र, सातारा लोकसभेचा पराभव भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी आता उदयनराजेंना पुन्हा सक्रिय करण्याची भुमिका घेतली आहे. त्यानुसार संसदेच्या हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांना मंत्रीपद दिले जाणार आहे. तसेच फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर त्यांना घेतले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून खात्रीलायकपणे सांगितले जात आहे. त्यामुळे लवकरच उदयनराजेंचे देशाच्या राजकारणात कमिंग बॅक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com