काम मधु चव्हाणांचे, श्रेय उदय सामंतांचे  ! 

काम मधु चव्हाणांचे श्रेय उदय सामंतांचे हा नवा फंडा चर्चिला जात आहे . युतीचे हेच ठरलय का ?, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे .
chavan-Samant
chavan-Samant

मुंबईता :  शिवसेना नेते  आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज म्हाडामध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्वसन कामाचा आढावा बैठक घेताला. हा आढावा घेतांना म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांना डावलण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 विशेष म्हणजे सभापती मधू चव्हाण यांना या बैठकीचे आमंत्रण न देता अध्यक्ष उदय सामंत यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन कामाचे श्रेय घेतल्याबद्दल म्हाडाच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.  त्यामुळे  काम मधु चव्हाणांचे श्रेय उदय सामंतांचे हा नवा फंडा चर्चिला जात आहे . युतीचे हेच ठरलय का ?, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे . 

   मधू चव्हाण यांनी मुंबई मंडळाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आठवड्याभरातच त्यांनी वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्वसन कामास प्राधान्य दिले. त्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस पक्षांच्या आमदार, नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठकाही त्यांनी घेतल्या होत्या. सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व बीडीडी चाळीच्या पदाधिकाऱ्यांशी म्हाडाच्या कार्यालयात सविस्तर चर्चा करून बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती दिली.

मधू चव्हाण हे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष  होते. त्यांच्या कामाची धडाडी पाहून त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचा 'कमळातील वाघ' असा सर्वांसमोर अभिमानाने गौरव करीत असत. या वाघालाच आजच्या बैठकीत शिवसेनेने नाकारले. युतीबाबत आमचं ठरलंय, असे वारंवार पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करीत असतात, भाजपाला वगळून श्रेय घ्यायचे, हेच ठरलंय का ? अशी चर्चा सर्वत्र होत आहे. 

        सभापती मधू चव्हाण यांनी सर्वप्रथम वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये म्हाडाविषयी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्या परिसरात जाऊन  बैठका घेतल्या. संक्रमण शिबिराविषयी असलेली भीती दूर केली, २८ जून २०१७ पर्यंतच्या सर्व भाडेकरूंना अधिकृत करण्याची ग्वाही दिली, वरळी बीडीडी चाळीतील ३ हजार बनावट रहिवाशांच्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश. चव्हाण यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com