उदय सामंत यांना परिवहन खाते मिळण्याची शक्‍यता

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. शिवसेनेच्या आमदारांमध्ये भास्कर जाधव हे सर्वात ज्येष्ठ व अनुभवी आमदार आहेत. तरीही त्यांना डावलून केवळ उदय सामंत यांना संधी मिळाली.
Uday Samant May Get Trasport Ministry
Uday Samant May Get Trasport Ministry

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना संधी मिळाली. सामंत यांनी विधानसभा निवडणुकीत आणि अडचणीच्या काळात पक्षाला बळ दिले त्यामुळेच सामंत यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याची चर्चा आहे. त्यांना परिवहन खाते मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. शिवसेनेच्या आमदारांमध्ये भास्कर जाधव हे सर्वात ज्येष्ठ व अनुभवी आमदार आहेत. तरीही त्यांना डावलून केवळ उदय सामंत यांना संधी मिळाली. त्यामुळे जाधव समर्थकांना धक्का बसला. सामंत यांनाच मंत्रिमंडळात स्थान का मिळाले याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. जाधवांच्या अनुभवापेक्षा सामंत यांनी पक्षासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. 

सामंत आणि जाधव दोघेही राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. मात्र, जाधवांच्या एक टर्म आधी सामंत शिवसेनेत आहेत. 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेना - भाजपने युती म्हणून लढवली. सेना, भाजपने समान जागा लढवल्या. भाजपने मित्र पक्षासाठी काही जागा सोडल्या खऱ्या परंतु मित्र पक्षाच्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली. सर्वाधिक जागा निवडून आणून मुख्यमंत्रीपदावर दावा करता यावा यासाठी केंद्रातील भाजपने सर्वप्रकारची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी केली होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मदतीला जे हात धावते त्यामध्ये सामंत यांचा प्रामुख्याने समावेश होता. 

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या उमेदवारांनाही सामंत यांनी सहकार्य केले होते. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शिवसेनेचे आमदार फुटू नये यासाठी त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथील देखभालही आमदार सामंत यांनीच केली. त्यांच्या या योगदानामुळेच सामंत यांचे पारडे संत्रीपदासाठी जड ठरले.

असा मोहरा मंत्रीमंडळात हवा

महाविकास आघाडीचा विस्तार झाल्यानंतर अनेक आमदार नाराज होणार हे निश्‍चित आहे. नाराजांना भाजप आपल्याकडे वळवून त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडणार त्यांना पुन्हा निवडून आणून राज्याची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेना, भाजपची ताकद आहे. त्याशिवाय उदय सामंत यांना मानणारा स्वतंत्र मतदार आहे. सामंत कोणत्याही पक्षात गेले तरी ते ताकद पणाला लावून निवडून येऊ शकतात, असा मोहरा मंत्रीमंडळात हवा असा विचार सेनेने केलेला असणार अशीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com