उद्धव ठाकरे बुधवारी पिंपरीत

उद्धव ठाकरे बुधवारी पिंपरीत

पिंपरीः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा येत्या बुधवारी (ता.९) पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे.ठाकरेंच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्यातच ही सभा होत आहे.

शहरात पिंपरी राखीव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ  होणाऱ्या या सभेच्या नियोजनासाठी शहर शिवसेनेची बैठक उद्या सकाळी  शहरातील शिवसेना भवनात होत आहे.

शहरातील भोसरी व चिंचवड या बाकीच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत.त्यामुळे तिन्ही मतदारसंघाला सोईच्या अशा ठिकाणी या सभेचे नियोजन करण्याचे चालले आहे.ती शहराच्या मध्यवर्ती भागात की मतदारसंघात म्हणजे पिंपरीतच घ्यायची याचा निर्णय़ उद्याच्या बैठकीत होणार आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी सांगितले.

महायुतीचा पहिला नेता यानिमित्ताने शहरात येत आहे. दुसरीकडे भाजपकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा घेण्याचे प्रयत्न सुर करण्यात आले आहेत. ती,मात्र भोसरीतील गावजत्रा मैदान वा चिंचवडमधील पीडब्लूडी ग्राऊंडवर होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com