इस्लामपुरात दोन वर्षांचे बाळही कोरोनाबाधित

आता 25 जणांच्या संपर्कात आलेल्या 337 जणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तिघांच्या स्वॅपचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. एका व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित दोघांचे स्वॅप निगेटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती इस्लामपूर येथील त्या कुटुंबाशी संबंधित आहे.
corona pune
corona pune

सांगली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आज एक धक्कादायक आणि मन हेलावून सोडणारी बातमी इस्लामपुरातून हाती आली. इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबातील अवघ्या दोन वर्षे वयाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला तत्काळ मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण इस्लामपूरसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांत आणखी एकाची भर पडली. इस्लामपूर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 25 झाली आहे.

दरम्यान, दोघांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. आता 25 जणांच्या संपर्कात आलेल्या 337 जणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तिघांच्या स्वॅपचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. एका व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित दोघांचे स्वॅप निगेटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती इस्लामपूर येथील त्या कुटुंबाशी संबंधित आहे.


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मुंबईपाठोपाठ जिल्ह्यात आहे. सहा दिवसांपूर्वी चार रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पाच आणि दोन अशी रुग्णसंख्या पुढे आली. इस्लामपुरातील एकाच कुटुंबाशी संबंधित आणखी 12 रुग्णांना कोरोना झाल्याने निष्पन्न झाले. त्यात दोन मोलकरणींचा समावेश आहे. संबंधित कुटुंबातील सदस्य हज यात्रेसाठी जाऊन आले होते. त्यामुळे या चार जणांशी संबंधित लोकांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची आकडेवारी सुरू झाली. सध्या सर्व रुग्णांवर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

पालकमंत्री जयंतरावांकडून
मिरज रुग्णालयाची पाहणी
सांगली : इस्लामपूर येथे 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात केले. आज या रुग्णालयाला पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. रुग्णांच्या तब्येतीची माहिती घेतली. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आहे.
मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. या भेटीदरम्यान शासकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी चर्चा केली.
सध्याच्या घडीला रुग्णालयात 315 बेड उपलब्ध आहेत, ज्यात 15 आय.सी.यू. बेड आहेत. सिटी स्कॅन, एम.आर.आय. या सुविधाही रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच येत्या तीन ते चार दिवसांत कोरोना तपासणी केंद्राची निर्मिती केली जाईल. अधिक व्हेंटिलेटर व पीपीईची मागणी आहे. ही मागणीही पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्‍टर, नर्सिंग स्टाफ, वाहनचालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल.

इस्लामपूर शहर
100 टक्के बंद
इस्लामपूर ः शहरात कोरोनाचा गुणाकार रोखण्यासाठी प्रशासनाने इस्लामपूर शहर पुढील तीन दिवस 100 टक्के लॉकडाउन राहील, असे जाहीर केले. त्या आवाहनानुसार आज इस्लामपूर शहर 100 टक्के लॉकडाउन करण्यात आले आहे. पोलिस वगळता शहरातील कोणत्याही रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा बाहेर पडले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com