आमदार रोहित पवार यांनी दिले दोन हजार लिटर जंतुनाशक

कर्जत तालुक्यासाठी 1000 लिटर व जामखेड तालुक्यासाठी 1000 लिटर सोडीअम हायपोक्लोराईड सोल्युशन देण्यात आल्याचे आमदार रोहित पवारांच्या जामखेड कार्यालयीन प्रमुख ओम कट्टे यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी दिले दोन हजार लिटर जंतुनाशक

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार  यांच्याकडून 'कोरोना' व्हायरस फैलाव रोखण्यासाठी शहरात व ग्रामीण भागात निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम हाती घेतली असून, याकरिता सोडियम हायपोक्लोराईड या सोल्युशनचे  2000 लिटर केमिकल पंचायत समिती व नगरपंचायतीच्या माध्यमातून वितरित केले आहे.

 लोकप्रतिनिधींनी सक्रिय होऊन जनतेच्या संरक्षणासाठी उचललेले हे पाऊलं जनतेच्या मनातील भिती कमी करण्यासाठी पूरक ठरते आहे. 
 जामखेड तालुक्यातील सर्व गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणीची मोहीम सुरू आहे. याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत निहाय निर्जंतुकीकरणाचे सोलुशन पोहचविण्याचे काम आमदार रोहित पवार यांच्या कडून सुरू आहे. 

जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी.पी. कोकणे यांच्याकडे जामखेड तालुक्यातील गावांकरिता साडे आठशे लिटर सोडीअम हायपोक्लोराईड केमिकल सुपूर्त केले आहे. ग्रामसेवकामार्फत ते गावोगावी पोहोचणार असून, फवारणी केली जाणार आहे. काही गावातील फवारणी ही पूर्ण झाली आहे.

 जामखेड नगरपालिके अंतर्गत निर्जंतुकीकरण फवारणी करिता 165 लिटर सोडीयम हायपोक्लोराईड सोलुशन फवारणीसाठी  दिले आहे.

प्रत्येक गावाने पुढे यावे
"देशावर आणि राज्यावर आलेल्या कोरोणाच्या आपत्तीशी आपण निकराने लढत आहोत. प्रशासनाच्या उपाययोजना आणि त्यांना जनतेचा असणार्या सहकार्य समन्वयातून आपणास ही लढाई जिंकायची आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघात निर्जंतुकीकरणासाठी 2000 लिटर सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन या जंतू नाशकाची फवारणी करीत आहोत. 

मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरात फवारणीसाठी सोडीअम हायपोक्लोराईड चे सोल्युशन संबंधित अधिकार्‍याकडे दिले आहे. तरी जंतुनाशक फवारणी सर्वांनी आपापल्या भागात लवकरात लवकर करून घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com